WhatsApp आपल्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितततेची काळजी घेतो. प्रायव्हसी आणि सिक्योरिटी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आणि Android ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी, WhatsApp ने एक Passwordless Login Option पर्याय लाँच केला आहे. या फीचरच्या मदतीने आता यूजर्सना एक आगळा-वेगळा अनुभव मिळणार आहे.
या फीचरच्या मदतीने WhatsApp ला लॉगिन प्रक्रिया सुरळीत करायची आहे, त्यासोबतच सुरक्षा देखील वाढवण्याची योजना आहे. या नवीन फीचरद्वारे ग्राहक त्यांचा चेहरा, फिंगरप्रिंट किंवा पिन वापरून WhatsApp खाते सहज अनलॉक करू शकतात.
WhatsApp ने याबाबत X म्हणजेच ट्विटरवर अकाउंटवर ही माहिती दिली आहे. हे नवीन फीचर बीटा टेस्टिंग दरम्यान देखील दिसले आहे, आता ते Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाले आहे. Passkey चे सपोर्ट Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी काही आठवडे किंवा महिने देखील लागू शकतात.
पारंपारिक पासवर्ड इत्यादींना पासकी हा पर्याय मानला जात आहे. हे फीचर आल्यानंतर यूजर्सला कोणत्याही पासवर्डवर अवलंबून राहावे लागणार नाही. Apple आणि Google ने त्यांच्या युजर्सना हा सपोर्ट आधीच दिला आहे. Google त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांचे पासवर्ड Passkeys वर हस्तांतरित करण्यास प्रोत्साहित करते.