How to: WhatsApp चे अप्रतिम फीचर्स लाँच! आता एकाच डिव्हाइसवर चालतील 2 Account चालतील, कसे ते बघा

Updated on 20-Oct-2023
HIGHLIGHTS

WhatsAppने 'मल्टिपल अकाउंट फीचर' लाँच केले आहे.

सध्या हे फिचर केवळ Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले गेले आहे.

नवा फिचर वापरण्यासाठी ग्राहकांकडे दुसरा नंबर आणि सिम कार्ड असणे आवश्यक

WhatsApp ने ‘मल्टिपल अकाउंट फीचर’ लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने एकाच उपकरणावर दोन खाती एकाच वेळी चालवता येणार आहेत. ज्यांना त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक खाती वेगळी ठेवायची आहेत त्यांच्यासाठी हे फिचर सर्वोत्तम आहे. तुम्ही आता हे सहज करू शकता. यासाठी पहिल्या खात्यातून साइन आउट करून दुसऱ्या खात्यात लॉग इन करण्याची गरज नाही.

मल्टिपल अकाउंट फीचर

WhatsApp

मल्टिपल अकाउंट फीचर वेगवेगळ्या टप्प्यात युजर्ससाठी आणले जाणार आहे. सध्या हे फिचर केवळ Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले गेले आहे. पण अद्याप सर्व Android वापरकर्त्यांना हे अपडेट मिळालेले नाही. या नवीन फिचरसाठी तुम्ही तुमचे WhatsApp अपडेट करून बघा. नवे फिचर IOS वर देखील लवकरच सादर केले जाईल.

मल्टिपल अकाउंट फीचरचा ‘अशा’प्रकारे वापर करा.

हे फीचर वापरण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये पुढील गोष्टी असणे आवश्यक आहेत.

  • WhatsApp नुसार, सर्व प्रथम ग्राहकांकडे दुसरा नंबर आणि सिम कार्ड असणे आवश्यक आहे.
  • यानंतर हे फीचर या फोनमध्ये सेटअप करता येईल, जे मल्टी-सिम सपोर्टसह येते किंवा या फोनमध्ये eSIM सपोर्ट देखील असावा.

जर तुमच्याकडे हे सर्व असेल तर तुम्ही एकाच डिव्हाइसमध्ये दोन WhatsApp अकाऊंट चालवू शकता.

WhatsApp

ड्युअल WhatsApp अकाउंट फीचर कसे काम करेल, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या?

  • दुसरे WhatsApp खाते सेट करण्यासाठी, तुम्हाला WhatsApp सेटिंग्जमध्ये जा.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या नावासमोर दिसणार्‍या एरोवर क्लिक करावे लागेल.
  • येथे तुम्हाला Add Account चा पर्याय मिळणार आहे.
  • यानंतर वापरकर्ते दोन्ही खाती स्वतंत्रपणे कस्टमाइझ करू शकतात.
  • तसेच, दोन्ही खात्यांमध्ये प्रायव्हसी आणि नोटिफिकेशन्स सेटिंग्ज देखील बदलू शकतात.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :