WhatsApp आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नवनवीन आणि उपयुक्त फीचर्स सादर करत असते. तुम्हाला माहितीच असेल की, काही काळापूर्वी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने व्हिडिओ कॉलसाठी नवीन फिल्टर आणि बॅकग्राउंड फिचर जारी केले होते. या फीचरद्वारे व्हिडिओ कॉल दरम्यान फिल्टर लागू करण्याची आणि बॅकग्राउंड बदलण्यास अनुमती देतो.
दरम्यान, या सिरीजमध्ये WhatsApp ने आता व्हिडिओ कॉलसाठी आणखी एक नवे अपडेट जारी केले आहे. या अपडेटद्वारे वापरकर्त्यांना लो-लाइट व्हिडिओ कॉलिंग मोड मिळतो.
WhatsApp चा नवीन लो-लाइट व्हिडिओ कॉलिंग मोड वापरकर्त्यांचा व्हिडिओ कॉल अनुभव सुधारणार आहे. हे फिचर लो लाईटमध्ये युजर्सना चांगली व्हिडिओ कॉलिटी प्रदान करणार आहे. विशेष म्हणजे या नव्या फीचरद्वारे आता WhatsApp यूजर्स रात्रीच्या अंधारात किंवा लो लाईटमध्येही Video कॉलिंग करू शकतील. हे फीचर Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे.
अशा प्रकारे, तुम्ही WhatsApp व्हिडिओ कॉल दरम्यान लो-लाईट व्हिडिओ कॉलिंग मोड ऑन करून कॉलिंगदरम्यान उत्तम व्हिडिओ कॉलिटीचा अनुभव घेऊ शकता. विशेषतः अंधारात व्हिडीओ कॉलचा अनुभव सुधारण्यासाठी हे फीचर खास आणले गेले आहे. हे फीचर सध्या निवडक युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. लवकरच हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआऊट करण्यात येईल.