WhatsApp Update: युजर्ससाठी नवा Low-light Video Calling मोड रोलआऊट,’अशा’प्रकारे करा वापर

WhatsApp Update: युजर्ससाठी नवा Low-light Video Calling मोड रोलआऊट,’अशा’प्रकारे करा वापर
HIGHLIGHTS

WhatsApp ने अलीकडेच व्हिडिओ कॉलसाठी नवीन फिल्टर आणि बॅकग्राउंड फिचर जारी केले.

WhatsApp ने आता व्हिडिओ कॉलसाठी आणखी एक नवे अपडेट जारी केले आहे.

WhatsApp चा नवीन लो-लाइट व्हिडिओ कॉलिंग मोड वापरकर्त्यांचा व्हिडिओ कॉल अनुभव सुधारेल.

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नवनवीन आणि उपयुक्त फीचर्स सादर करत असते. तुम्हाला माहितीच असेल की, काही काळापूर्वी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने व्हिडिओ कॉलसाठी नवीन फिल्टर आणि बॅकग्राउंड फिचर जारी केले होते. या फीचरद्वारे व्हिडिओ कॉल दरम्यान फिल्टर लागू करण्याची आणि बॅकग्राउंड बदलण्यास अनुमती देतो.

दरम्यान, या सिरीजमध्ये WhatsApp ने आता व्हिडिओ कॉलसाठी आणखी एक नवे अपडेट जारी केले आहे. या अपडेटद्वारे वापरकर्त्यांना लो-लाइट व्हिडिओ कॉलिंग मोड मिळतो.

whatsapp tips

WhatsApp चे नवे Low-light Video Calling मोड

WhatsApp चा नवीन लो-लाइट व्हिडिओ कॉलिंग मोड वापरकर्त्यांचा व्हिडिओ कॉल अनुभव सुधारणार आहे. हे फिचर लो लाईटमध्ये युजर्सना चांगली व्हिडिओ कॉलिटी प्रदान करणार आहे. विशेष म्हणजे या नव्या फीचरद्वारे आता WhatsApp यूजर्स रात्रीच्या अंधारात किंवा लो लाईटमध्येही Video कॉलिंग करू शकतील. हे फीचर Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे.

नव्या फीचरचा वापर कसा करावा?

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करा.
  • आता तुमच्या कोणत्याही संपर्काला व्हिडिओ कॉल करा.
  • व्हिडिओ कॉल दरम्यान लो-लाइट व्हिडिओ कॉलिंग मोड वापरण्यासाठी तुम्हाला तुमचे व्हिडिओ फीड फुल स्क्रीन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला वरच्या कोपऱ्यावर एक बल्ब आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करा.
  • या आयकॉनवर टॅप केल्याने लो लाईटमध्येही तुमची व्हिडिओ कॉलिटी सुधारेल.
whatsapp video calling features

अशा प्रकारे, तुम्ही WhatsApp व्हिडिओ कॉल दरम्यान लो-लाईट व्हिडिओ कॉलिंग मोड ऑन करून कॉलिंगदरम्यान उत्तम व्हिडिओ कॉलिटीचा अनुभव घेऊ शकता. विशेषतः अंधारात व्हिडीओ कॉलचा अनुभव सुधारण्यासाठी हे फीचर खास आणले गेले आहे. हे फीचर सध्या निवडक युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. लवकरच हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआऊट करण्यात येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo