WhatsApp Update: लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर अनेक मजेशीर फीचर्स उपलब्ध आहेत. त्यापैकी एक मजेशीर फिचर म्हणजे ‘स्टिकर्स’ होय. तुम्हाला माहितीच आहे की, बहुतेक वापरकर्ते चॅटिंग करताना स्टिकर्स वापरतात. स्टिकर्समुळे तुमची चॅटिंग आणखी मजेशीर होते. मात्र, आता चॅटिंगची मजा द्विगुणित होणार आहे, कारण GIPHY चे ॲनिमेटेड स्टिकर्स लवकरच ॲपमध्ये उपलब्ध होणार आहेत. WhatsApp च्या अधिकृत चॅनल लॉगवरून ही माहिती मिळाली आहे.
WhatsApp ने आपल्या नव्या फिचरची माहिती वर सांगितल्यराप्रमाणे, WhatsApp च्या अधिकृत चॅनेल आणि Wabetainfo च्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटद्वारे जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवीन अपडेट अंतर्गत GIPHY ला प्लॅटफॉर्मवर सपोर्ट करण्यात आला आहे.
या फिचरद्वारे वापरकर्ते ॲनिमेटेड स्टिकर्सद्वारे त्यांच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकतील, असे म्हटले जात आहे. हे फिचर विशेषतः जेव्हा वापरकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक स्टिकर ट्रेमध्ये उपलब्ध नसलेले स्टिकर पाठवायचे असेल तेव्हा उपयुक्त ठरणार आहे. अशा परिस्थितीत, GIPHY वापरकर्त्यांना WhatsApp वर प्राप्त झालेल्या मॅसेजेसना उत्तर देण्यासाठी परिपूर्ण ॲनिमेटेड स्टिकर्स प्रदान करेल. यासह तुमची चॅटिंग अधिकाधिक मजेशीर होणार आहे.
WhatsApp वर GIPHY स्टिकर्स व्यतिरिक्त, मूव्ह स्टिकर फंक्शन देखील या ॲपमध्ये जोडले गेले आहे. यासह, वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार स्टिकर ट्रेमध्ये त्यांचे आवडते स्टिकर्स व्यवस्थित करण्यास सक्षम असतील. या अपडेटमुळे स्टिकर्समध्ये प्रवेश करणे अधिक सोपे होणार आहे.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, WhatsApp ने दोन्ही फीचर्स लाँच केले आहेत. येत्या आठवड्यात GIPHY आणि मूव्ह स्टिकर फीचर्ससाठी iPhone वापरकर्त्यांना सपोर्ट मिळणार आहे. अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी त्याचा सपोर्ट जारी केला जाईल की नाही, हे सध्या स्पष्ट करण्यात आलेले नाही.