WhatsApp युजर्ससाठी खुशखबर, हे नवीन फीचर्स चॅटिंगला अधिक मजेदार बनवतील

Updated on 18-Oct-2022
HIGHLIGHTS

WhatsApp वर येणारे नवीन आणि महत्त्वाचे फीचर्स

तुमचा चॅटिंग आनंद होईल द्विगुणित

फोटो-व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत आहे. गेल्या काही महिन्यांत WhatsApp मध्ये अनेक उत्तमोत्तम फीचर्स दाखल झाले आहेत. या एपिसोडमध्ये कंपनी आता यूजर्ससाठी आणखी काही नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. या फीचर्समुळे व्हॉट्सऍप वापरण्याची मजा द्विगुणित होईल. कंपनीच्या या नवीन फीचर्समध्ये एडिट मेसेज आणि स्क्रीनशॉट ब्लॉकिंगचाही समावेश आहे. 

हे सुद्धा वाचा : Amazonच्या फेस्टिव्हल सेलच्या शेवटच्या दिवसांमध्ये फोनवरील सर्वोत्तम डील्स, बघा यादी

1024 सदस्य गृपमध्ये सामील होतील

ग्रुपसाठी व्हॉट्सऍपवर एक मोठे फीचर येणार आहे. कंपनी आता ग्रुपमध्ये तब्बल 1,024 सदस्य जोडण्याची सुविधा देणार आहे. आत्तापर्यंत, कोणत्याही गटात केवळ 512 संपर्क जोडले जाऊ शकतात. हे फिचर लवकरच Android आणि iOS च्या निवडक बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल.

फोटो-व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही

व्हॉट्सऍपचे हे आगामी फीचर युजर्सच्या सिक्योरिटी आणि प्रायव्हसीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या फिचरची बऱ्याच काळापासून मागणी सुरु होती. त्याच्या रोलआउटनंतर, View Once मार्क करून पाठविलेले फोटो आणि व्हिडिओंचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत. कंपनीने काही अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी हे फीचर आणले आहे. त्याचे स्टेबल वर्जन लवकरच रिलीज होईल, अशी अपेक्षा आहे.

पाठवल्यानंतरही मॅसेज एडिट करा.

व्हॉट्सऍपच्या या फीचरचा खूप उपयोग होत आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर यूजर्स पाठवलेला मेसेज 15 मिनिटांत एडिट करू शकतील. एडिट मॅसेज एडिट लेबलसह चॅट बबलमध्ये दिसतील. यामुळे मॅसेज पाठवल्यानंतर तो संपादित केला गेला आहे हे रिसिव्हरला कळेल. एडिटेड मेसेजमध्ये चूक असल्यास ते पुन्हा एडिट करता येईल का, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. व्हॉट्सऍपचे हे आगामी फीचर सध्या विकसित होण्याच्या टप्प्यात आहे. कंपनी लवकरच ते बीटा चाचणीसाठी आणण्याची अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :