WhatsApp आपल्या लाखो वापरकर्त्यांचा चॅट अनुभव पूर्वीपेक्षा अधिक मजेदार आणि सुरक्षित बनवण्यासाठी नवीन फीचर्स आणत असतो. यामुळेच गेल्या काही वर्षांत व्हॉट्सऍपमध्ये अनेक नवीन फीचर्स दाखल झाले आहेत. यात अनेक असे फीचर्स आहेत, जे विशेषतः वापरकर्त्यांच्या प्रायव्हसी आणि सेफ्टीवर फोकस करून जारी करण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सऍपमध्ये आलेल्या अशाच काही लेटेस्ट फीचर्सबद्दल सांगणार आहोत.
व्हॉट्सऍपचे हे फीचर युजर्सना खूप आवडले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्हाला ठरवता येईल की, कोणते कॉन्टॅक्ट तुमचे प्रोफाइल पिक्चर, स्टेटस आणि लास्ट सीन पाहू शकतात. यासाठी कंपनी आता अकाउंट्सच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये लास्ट सीन, स्टेटस आणि प्रोफाइल पिक्चरसाठी My contacts except चा पर्याय देत आहे. या पर्यायावर जाऊन तुम्ही ते संपर्क निवडू शकता, ज्यांना तुम्हाला हे डिटेल्स दाखवायचे नाहीत.
हे सुद्धा वाचा : BSNL VS Vodafone Idea : 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 'या' दोन प्लॅन्समध्ये जोरदार स्पर्धा
या फीचरमुळे, पाठवलेला कोणताही मॅसेज ऑटोमॅटिकली डिलीट होईल. मेसेज आपोआप डिलीट करण्यासाठी कंपनी 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवसांचा पर्याय देते.
एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचे काम तुमच्या चॅट्स लीक होण्यापासून संरक्षण करणे आहे. हे फिचरमुळे मॅसेज सेंडर आणि रिसिव्हर यांच्यामध्येच राहील. कोणतीही थर्ड पार्टी हा मॅसेज ऍक्सेस करू शकत नाही, ज्यामध्ये फेसबुक, ऍपल आणि गुगलचा समावेश आहे.
2021 च्या शेवटी, कंपनीने WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्रायव्हसी फिचर आणले. या फीचरचे काम असे आहे की, ते तुमचे लास्ट सीन फक्त त्या वापरकर्त्यांना दाखवते ज्यांच्याशी तुम्ही आधी चॅट केले आहे. जर तुमच्या संपर्कात असे कोणी असेल ज्याच्याशी तुम्ही कधीही चॅट केले नसेल, तर ते तुमचे व्हॉट्सऍपचे लास्ट सीन पाहू शकणार नाहीत.