WhatsApp New Features 2025: नवे इंटरेस्टिंग फीचर्स लाँच, आता बनवता येतील आकर्षक सेल्फी Stickers
मागील वर्षी व्हॉट्सॲपने आपल्या युजर्ससाठी अनेक नवीन आणि उपयुक्त फीचर्स सादर केले.
WhatsApp ने एका ब्लॉग पोस्टद्वारे WhatsApp च्या नवीन फीचर्सबद्दल माहिती दिली.
नवीनतम सेल्फी स्टिकर्स आणि क्विकर रिऍक्शन फीचर्स रोल आऊट
WhatsApp New Features: प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर सतत नवनवीन फीचर्स येत असतात. मागील वर्षी व्हॉट्सॲपने आपल्या युजर्ससाठी अनेक नवीन आणि उपयुक्त फीचर्स सादर केले आहेत. दरम्यान, आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने दोन नवीन फीचर्स सादर केले आहेत. वापरकर्त्यांना आता त्यांच्या सेल्फीमधून स्टिकर्स तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. हे एक मजेशीर फिचर आणले गेले आहे.
एवढेच नाही तर, मेसेजवर प्रतिक्रिया देण्याची प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे. हे फीचर iOS आणि अँड्रॉइड दोन्ही वापरकर्त्यांसाठी रोल आऊट करण्यात आले आहे. जाणून घेऊयात सविस्तर-
WhatsApp New Features
जगप्रसिद्ध WhatsApp ने 14 जानेवारी 2025 रोजी एका ब्लॉग पोस्टद्वारे WhatsApp च्या नवीन फीचर्सबद्दल माहिती दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ब्लॉग पोस्टमध्ये कॅमेरा इफेक्ट्स, सेल्फी स्टिकर्स, शेअर अ स्टिकर पॅक आणि क्विकर रिऍक्शन फीचर्सचा उल्लेख केला आहे. लक्षात घ्या की. कॅमेरा इफेक्ट आणि शेअर स्टिकर पॅक फीचर व्हॉट्सॲपवर आधीच उपलब्ध आहे. तर, सेल्फी स्टिकर्स आणि क्विकर रिऍक्शन फीचर्स आता रोल आऊट झाले आहेत.
New @WhatsApp features, including camera effects, selfie stickers and quicker reactions, make the app more fun and easier to use.https://t.co/4nps9EILtJ pic.twitter.com/0zrNsdCxEb
— Meta Newsroom (@MetaNewsroom) January 14, 2025
Also Read: Flipkart सेलमध्ये टॉप 5G Smartphones वर भारी Discount उपलब्ध, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी
सेल्फी स्टिकर्स फिचर
सेल्फी स्टिकर फिचर कस्टम स्टिकर्स लव्हर्ससाठी खूप उपयुक्त आहे. नावावरून तुम्हाला कळलेच असेल की, आता तुम्ही तुमचे सेल्फी थेट स्टिकर्समध्ये रूपांतरित करण्यास सक्षम असला. हे फिचर वर सांगितल्याप्रमाणे, Android आणि iOS दोन्हीसाठी वापरता येणार आहे.
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम स्टिकर ऑप्शन्सवर टॅप करावे लागेल.
- यानंतर, तुम्हाला Create या ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला स्टिकरसह कॅमेरा आयकॉन दिसेल.
- तुम्ही त्यावर क्लिक करताच कॅमेरा ओपन होईल. आता तुम्ही सेल्फी स्टिकर्स तयार करू शकता.
Quicker Reactions
WhatsApp च्या नव्या क्विकर रिऍक्शन फीचरद्वारे वापरकर्ते आता सहजपणे मॅसेजेसवर प्रतिक्रिया देण्यास सक्षम असतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, आत्तापर्यंत फीडबॅक देण्यासाठी तुम्हाला मेसेजवर आधी लॉन्ग प्रेस करावे लागत होते आणि त्यानंतर प्रतिक्रियांची यादी दिसत होती. मात्र, आता ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. प्रतिक्रिया सूची केवळ दोन टॅप केल्यावर ओपन होईल. लक्षात घ्या की, हे इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया देण्यासारखे आहे. या दोन फीचर्समुळे व्हॉट्सॲप युजर्ससाठी आणखी उपयुक्त आणि मजेशीर झाले आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile