WhatsApp चॅट्स होणार मजेशीर! आता Avtar द्वारे करता येईल स्टेटस रिप्लाय, ईमोजीसोबत मिळेल New ऑप्शन। Tech News

WhatsApp चॅट्स होणार मजेशीर! आता Avtar द्वारे करता येईल स्टेटस रिप्लाय, ईमोजीसोबत मिळेल New ऑप्शन। Tech News
HIGHLIGHTS

WhatsApp युजर्सचा 'Status' अनुभव लवकरच अपग्रेड होणार आहे.

WhatsApp बीटाद्वारे वापरकर्त्यांना अवतारद्वारे स्टेटस अपडेटला उत्तर देण्याची सुविधा मिळेल.

तुम्ही 8 अवतारांद्वारे स्टेटसला रिप्लाय करू शकणार आहात.

WhatsApp युजर्सचा ‘Status’ अनुभव लवकरच अपग्रेड होणार आहे. एरवी इतर संपर्कांचे स्टेटस पाहिल्यानंतर युजर्स एकतर मजकूर लिहून किंवा इमोजीद्वारे तुमच्या भावना व्यक्त म्हणजे स्टेटस रिप्लाय करत होते. मात्र, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने एक नवीन अपडेट जारी केले आहे. या अपडेटद्वारे वापरकर्ते WhatsApp स्टेटसला उत्तर देण्यासाठी ऍनिमेटेड ‘अवतार’ वापरण्यास सक्षम असतील.

WhatsApp च्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजचा मागोवा घेणारी Wabetainfo च्या ताज्या अहवालात, अशी माहिती देण्यात आली आहे की,WhatsApp बीटाद्वारे वापरकर्त्यांना अवतारद्वारे स्टेटस अपडेटला उत्तर देण्याची सुविधा मिळाली आहे. म्हणजेच रोल आउट केलेल्या नवीनतम अपडेटद्वारे, आता इमोजीसह अवतारचा पर्याय देखील स्टेटसला रिप्लाय करण्यासाठी उपलब्ध असेल.

Avtar द्वारे स्टेटस रिप्लाय

हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि IOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाले आहे. सध्या केवळ काही बीटा टेस्टर्सना या फिचरची झलक मिळाली आहे. याचा स्क्रीनशॉटही रिपोर्टमध्ये शेअर करण्यात आला आहे. वापरकर्ते अवतारद्वारे स्टेटसला कशाप्रकारे रिप्लाय देऊ शकतील, हे पोस्टमध्ये पाहिले जाऊ शकते. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या WhatsApp स्टेटसमधील रिप्लाय बटणवर टॅप करता तेव्हा तुम्हाला इमोजीसह अवतार आयकॉन देखील मिळेल. अवतार चिन्हावर क्लिक करून, तुम्ही वैयक्तिक अवताराद्वारे WhatsApp स्टेटसला रिप्लाय करू शकता.

आतापर्यंत स्टेटसला रिप्लाय देण्यासाठी केवळ 8 इमोजीचा पर्याय होता. त्याचप्रमाणे, तुम्ही 8 अवतारांद्वारे स्टेटसला रिप्लाय करू शकणार आहात. पोस्टनुसार, बीटा टेस्टार्स ऍनिमेटेड अवतारांद्वारे त्यांच्या संपर्कांना उत्तर देण्यास सक्षम असतील, हे दिसत आहे.

whatsapp
whatsapp

WhatsApp चे आगामी फीचर्स

WhatsApp वर भविष्यात लवकरच अनेक नवीन फीचर्स सादर होणार आहेत. अलीकडेच, ताज्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, यावर लवकरच एक नवीन चॅट लॉक शॉर्टकट येणार आहे. तसेच, चॅट लॉक करण्यासाठी नवा सिक्रेट कोड येणार आहे. याशिवाय, इव्हेंट तयार करण्याची सुविधा, जुने मेसेज सर्च करण्याची नवी सुविधा, नवीन कॅलेंडर फिचर इ. सुविधा मिळतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo