Who can see when I am online फिचर निवडक बीट टेस्टर्ससाठी उपलब्ध
तुमचे ऑनलाईन स्टेटस कोण बघेल ते तुम्ही ठरवा
WhatsApp यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने अखेर ते फिचर आणले आहे, ज्याची लाखो वापरकर्ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. नवीन फीचरचे नाव 'Who can see when I am online' असे आहे. व्हॉट्सऍपच्या या नवीन फीचरमुळे यूजर्स ऍप वापरताना त्यांचे ऑनलाइन स्टेटस लपवू शकणार आहेत. व्हॉट्सऍप सेटिंग्जच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये दिलेल्या लास्ट सीन आणि ऑनलाइन ऑप्शनमध्ये यूजर्सना हा पर्याय मिळेल.
लास्ट सीन आणि ऑनलाइन पर्यायावर जाऊन यूजर्स त्यांच्या ऑनलाइन स्टेटसची सेटिंग बदलू शकतात. लास्ट सीन मध्ये युजर्सना चार पर्याय मिळतील – Everyone, My Contacts, My Contact Except आणि Nobody. तर, ऑनलाइन स्टेटससाठी कंपनी Everyone आणि Same as last seen चा पर्याय देत आहे. Who can see my last seen मध्ये My contacts except हा पर्याय निवडून, तुमच्या ऑनलाइन असण्याबद्दल कोणाला माहिती मिळते आणि कोण नाही हे तुम्हाला ठरवता येणार आहे.
बीटा टेस्टर्ससाठी नवीन फिचर
व्हॉट्सऍप अँड्रॉइडचे बीटा वर्जन 2.22.20.9 मध्ये काही निवडक बीटा टेस्टर्स कंपनी सध्या हे फीचर देत आहे. कंपनी यशस्वी बीटा टेस्टींगनंतर जागतिक वापरकर्त्यांसाठी या फिचरचे स्टेबल वर्जन आणेल अशी अपेक्षा आहे. सध्या, फीचरच्या ऑफिशियल स्टेबल रोलआउट डेटबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.