प्रतीक्षा संपली! अखेर इंटरनेटशिवाय वापरता येईल WhatsApp, लवकरच येणार सर्वोत्कृष्ट फीचर

प्रतीक्षा संपली! अखेर इंटरनेटशिवाय वापरता येईल WhatsApp, लवकरच येणार सर्वोत्कृष्ट फीचर
HIGHLIGHTS

WhatsApp वर लवकरच इंटरनेटशिवाय फाईल्स शेअर करता येतील.

Nearby Share फीचरची Android आणि iOS वर आवृत्तीवर टेस्टिंग सुरु

Nearby Share फीचर वापरण्यासाठी पाठवणाऱ्याला WhatsApp वर एक QR कोड जनरेट करावा लागेल.

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp सतत नवीन फीचर्स सादर करत आहेत. वापरकर्त्यांच्या अनुभव सुधारण्यासाठी WhatsApp अनेक नवीन आणि अनोखे फिचर आणत आहे. मेसेजिंग ऍपचे वापरकर्ते सर्वत्र पसरले आहेत. पण पूर्वीपासून हे ऍप केवळ इंटरनेटवर चालवता येते.

काही महिन्यांपूर्वी, अशी बातमी आली होती की WhatsApp एका अशा फीचरवर काम करत आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्ते इंटरनेट कनेक्शनशिवाय इतरांसोबत फाइल्स शेअर करू शकतील. जे Apple च्या AirDrop सारखे आहे. मात्र, हे फिचर तेव्हा जरी Android OS साठी टेस्टिंग केली जात असली तरी, हे फिचर iPhone वापरकर्त्यांसाठी देखील विकसित होत आहे, असे सांगितले जात आहे.

इंटरनेटशिवाय WhatsApp फाईल्स शेअर करता येतील.

WhatsApp च्या आगामी फिचर आणि ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo ने सोशल मीडिया अकाउंटद्वारे नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनुसार, iOS आवृत्तीसाठी नवीनतम WhatsApp बीटामध्ये एक नवीन फिचर समाविष्ट करण्यात आले आहे.

नवे फिचर वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय इतर जवळपासच्या वापरकर्त्यांसह फाईल्स शेअर करण्यास अनुमती देतो. या फिचरसह, वापरकर्ते एंड-टू-एंड एनक्रिप्टेड कनेक्शन वापरून Photo, Video आणि Documents जवळपासच्या लोकांसह वायरलेसपणे शेअर करू शकतात.

मात्र, नव्या फाइल शेअरिंग फीचरचे Android वर्जन अद्याप आणले गेले नाही. लक्षात घ्या की, WhatsApp सध्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मर्यादित संख्येच्या बीटा वापरकर्त्यांसह नव्या फीचरची टेस्टींग करत आहे. WABetaInfo च्या अहवालात एक स्क्रीनशॉट देखील समाविष्ट आहे, जेथे या फाइल शेअरिंग फिचरला ‘Nearby Share’ असे नाव देण्यात आले आहे.

Nearby Share फीचरचा ‘अशा’ प्रकारे करता येईल वापर

WhatsApp new favourite filter lets you access important contacts more easily

Nearby Share फीचर वापरण्यासाठी पाठवणाऱ्याला WhatsApp वर एक QR कोड जनरेट करावा लागेल. नंतर प्राप्तकर्त्याला ते स्कॅन करावे लागेल, याद्वारे दोन्ही उपकरणे जोडली जातील. या प्रक्रियेनंतर दोन्ही वापरकर्ते एकमेकांशी फाइल्स शेअर करू शकतील. मात्र, Android ॲपमध्ये या फिचरसाठी वापरकर्त्यांनी फाइल-शेअरिंग रिक्वेस्ट स्वीकारण्यासाठी जवळपासच्या डिव्हाइसेसचा शोध घेणे आवश्यक आहे. नवे फिचर सर्व युजर्ससाठी कधी रोलआऊट होणार याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo