WhatsApp मध्ये एक मजेशीर फीचर आले आहे. हे फिचर सुरू झाल्याने आता प्रोफाइल पिक्चर लावण्याची मजा काही औरचं होणार आहे. व्हॉट्सऍपच्या या नवीन फीचरचे नाव 'अवतार' असे आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स प्रोफाइल पिक्चरमध्ये त्यांचा नवीन अवतार मित्र आणि कुटुंबीयांना दाखवू शकतात. वापरकर्ते व्हॉट्सऍप सेटिंग्जमध्ये जाऊन डिजिटल एक्सप्रेशन असलेले अवतार स्टिकर्स प्रोफाइल पिक्चर म्हणून सेट करू शकतात. WABetaInfo ने ट्विट करून नवीन फीचरची माहिती दिली आहे.
हे सुद्धा वाचा : दिवाळीला नवीन फोन खरेदी करायचंय? 20,000 रुपयांच्या आत सर्वोत्तम 5G स्मार्टफोन, टॉप 5 बेस्ट डिल्स
WABetaInfo ने आपल्या ट्विटमध्ये एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही 'अवतार'चा नवीन स्टिकर पॅक दिसेल. नवीन अपडेटनंतर WhatsApp आपोआप एक नवीन स्टिकर पॅक तयार करेल आणि तुम्ही ते मित्र आणि कुटुंबियांसोबत सहज शेअर करू शकता. खास गोष्ट म्हणजे तुम्ही यापैकी कोणताही अवतार तुमच्या मूडनुसार प्रोफाइल पिक्चर म्हणून सेट देखील करू शकणार आहात.
https://twitter.com/WABetaInfo/status/1583284808142098433?ref_src=twsrc%5Etfw
WAbetaInfo नुसार, कंपनी सध्या निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी हे फिचर आणत आहे. त्याची स्टेबल वर्जन बीटा टेस्टिंग पूर्ण झाल्यावर जागतिक वापरकर्त्यांसाठी आणली जाईल. जर तुम्ही बीटा टेस्टर असाल आणि तुम्हाला व्हॉट्सऍप सेटिंग्जमध्ये अवतारचा पर्याय दिसत असेल तर तुम्हाला ते वापरता येईल.
व्हॉट्सऍपचे हे आगामी फीचर युजर्सच्या सिक्योरिटी आणि प्रायव्हसीसाठी खूप उपयुक्त असतील. फोटो व्हीडिओ स्क्रिनशॉट ब्लॉकिंग फीचरच दीर्घ काळापासून मागणी होती. त्याच्या रोलआउटनंतर, 'व्ह्यू वन्स' करून पाठविलेले फोटो आणि व्हिडिओंचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत. कंपनीने काही अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी हे फीचर आणले आहे. त्याचे स्टेबल वर्जनही लवकरच प्रसिद्ध होणार आहे.