WhatsApp वर येणार महत्त्वाचे अपडेट! Meta AI होणार आणखी ऍडव्हान्स, तुमचा फोटो सहज करेल Edit

Updated on 09-Jul-2024
HIGHLIGHTS

Meta AI काही काळापूर्वी Whatsapp वर सादर करण्यात आले.

'Meta AI Reply and edit photos' नावाचे एक नवीन फीचर लवकर ऍपवर येणार

मेटा AI आता तुमच्या फोटोंना उत्तर देईल आणि तुम्ही ते एडिट देखील करू शकता.

WhatsApp Update: आपणा सर्वांना माहितीच आहे की, WhatsApp च्या फीचर्समध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनी सतत काम करत असते. Meta AI काही काळापूर्वी Whatsapp वर सादर करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Meta AI WhatsApp वर तुमची अनेक कार्ये सुलभ करते. आम्ही तुम्हाला सांगतो की, याद्वारे विविध प्रकारचे फोटोजही तयार करता येतात.

ताज्या अहवालानुसार, आजकाल इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म मेटा AI ला प्रगत बनवण्यासाठी काम करत आहे. ‘Reply and edit photos’ नावाचे एक नवीन फीचर त्यात जोडले जाऊ शकते. या नव्या फीचरसह ज्याद्वारे वापरकर्ते त्यांचे फोटो Meta AI मध्ये अपलोड करू शकतात आणि त्यासंबंधित प्रश्न विचारू शकतात. युजर Meta AI ला त्याचा फोटो एडिट करण्यास सांगू शकतो.

Also Read: VI New Plan: कंपनीने लाँच केला नवीन REDX पोस्टपेड प्लॅन, लोकप्रिय OTT सबस्क्रिप्शन मिळतील Free

Meta AI Reply and edit photos फिचर

Wabetainfo ने आपल्या ताज्या रिपोर्टमध्ये मेटा AI रिप्लाय आणि WhatsApp च्या फोटो एडिट फीचरबद्दल माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, Meta AI मध्ये फोटोंना रिप्लाय आणि एडिट करण्यासाठी लवकरच एक डेडिकेटेड बटण दिले जाईल. याद्वारे यूजर्स मेटा AI चॅटमध्ये त्यांचे फोटो अपलोड करू शकतील.

एवढेच नाही तर, वापरकर्ते मेट AI ला त्या फोटोशी संबंधित प्रश्नांची उत्तरे विचारू शकतात. उदा. फोटोमध्ये दिसणारे ठिकाण कोणते आहे? मेटा AI तुम्हाला त्या फोटोच्या प्रश्नाचे उत्तर चॅट रिप्लाय म्हणून देईल. इतकंच नाही तर, तुम्ही तुमचा फोटो Meta AI सह एडिट देखील करू शकता.

वर दिलेल्या पोस्टमधील स्क्रिनशॉटनुसार, या दोन चित्रे दिसत आहेत. यावरून समजते की, फोटो टेक्स्ट बारमध्ये इमोजीच्या जागी कॅमेरा आयकॉन दिसू शकतो. या आयकॉनवर क्लिक करून वापरकर्ते त्यांचे फोटो Meta AI वर पाठवू शकतात. त्याबरोबरच, दुसऱ्या चित्रात असे लिहिले आहे की, “मेटा AI आता तुमच्या फोटोंना उत्तर देईल आणि तुम्ही ते एडिट देखील करू शकता.”

सध्या Meta AI reply to photos and edit हे नवे फिचर अजूनही डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आगामी अपडेटसह वापरकर्त्यांसाठी ते रोल आउट करेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मेटा AI फिचर देखील टप्प्याटप्प्याने सर्व युजर्सना मिळत आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :