इन्स्टंट मेसेजिंग ऍप Whatsappवरील वापरकर्त्यांची सोय आणि वापरकर्ता इंटरफेस सुधारण्यासाठी सतत नवीन फिचर आणत आहे. अलीकडेच व्हॉट्सऍपने ऑनलाइन स्टेटस लपवण्याची सुविधाही जारी केली आहे. या फिचरसह, कंपनीने चांगल्या गुणवत्तेत फोटो शेअर करण्यासाठी सर्वोत्तम दर्जाचे नवीन फिचर देखील जारी केले आहे. या फीचरच्या मदतीने आता चांगल्या आणि मूळ दर्जाचे फोटो पाठवता येणार आहेत. या फीचरबद्दल जाणून घेऊया…
हे सुद्धा वाचा : Oppo च्या नवीन फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंग, मिळेल पॉवरफुल प्रोसेसर
व्हॉट्सऍपवर दीर्घ प्रतीक्षेनंतर हे फीचर जारी करण्यात आले आहे. फोटो अपलोड करताना त्यांचा दर्जा कमी होत असल्याच्या तक्रारी यूजर्स बऱ्याच दिवसांपासून करत आहेत. या फीचरमध्ये आता यूजर्सना पाठवल्या जाणाऱ्या फोटोची क्वालिटी निवडण्याची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच, वापरकर्ते त्यांच्या इच्छेनुसार बेस्ट कॉलिटी, ऑटो आणि डेटा सेव्हरमधून कोणताही पर्याय निवडू शकतात.
नवीन फीचर्स अंतर्गत, युजर्सना व्हॉट्सऍप सेटिंग्जमध्ये स्वतंत्र फोटो अपलोड कॉलिटी सेक्शन देण्यात आला आहे. तुम्हाला iButton वरून Settings वर जावे लागेल. येथून तुम्हाला Storage and data पर्यायावर टॅप करावे लागेल, त्यानंतर बॉटममध्ये तुम्हाला नवीन मीडिया अपलोड कॉलिटी पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तीन बेस्ट कॉलिटी, ऑटो आणि डेटा सेव्हर पर्याय मिळतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडू शकता. लक्षात घ्या की, बेस्ट कॉलिटीच्या पर्यायामध्ये, फोटो सर्वोत्तम गुणवत्तेत पाठवले जाऊ शकतात.