तुम्हीही iPhone WhatsApp यूजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक फिचर आले आहे. व्हॉट्सऍपने आपल्या आयफोन वापरकर्त्यांसाठी तारखेनुसार मॅसेज सर्च करण्याचा पर्याय दिला आहे. नवीन अपडेटेड ऍप Apple ऍप स्टोअरवर मिळेल.
नवीन अपडेटनंतर, iPhone वापरकर्ते तारखेनुसार कोणताही व्हिडिओ, मजकूर किंवा डॉक्युमेंट फाइल असलेले मॅसेज शोधण्यात सक्षम होतील. जर तुम्हाला हे अपडेट मिळाले नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला त्याचे अपडेट लवकरच मिळेल. पूर्वीचे मॅसेजेस कीवर्डसह शोधले जात होते.
नवीन अपडेटसोबत ड्रॅग अँड ड्रॉप फीचरही आले आहे. म्हणजेच व्हॉट्सऍप चॅटचा फोटो-व्हिडिओ ड्रॅग करून तुम्हाला ते इतर कोणत्याही ऍपमध्ये टाकता येईल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला व्हॉट्सऍपवर फोटो मिळाला असेल, तर तुम्ही तो सेव्ह न करता Gmail वर ड्रॅग करू शकता.
आम्ही तुम्हाला सांगतो की, नुकतेच मेटा यांच्यावर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp सह EU डेटा संरक्षण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. मेटाला आयरिश नियामकाने गुरुवारी अतिरिक्त 5.5 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 47.8 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, दोन आठवड्यांपूर्वी, युरोपियन युनियनने समान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मेटाच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्लॅटफॉर्मवर 390 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 3,429 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.