आता तुमच्या इच्छेशिवाय कुणीही तुम्हाला ऑनलाईन पाहू शकणार नाही
Whatsapp वर ऑनलाइन स्टेटस लपवण्याची प्रक्रिया बघा
Whatsapp आपल्या ग्राहकांची प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच नवीन फिचर आणत असतो. आता ऍपवर अखेर ते फीचर आले आहे, ज्याची प्रत्येकजण खूप दिवसांपासून वाट पाहत होते. व्हॉट्सऍपने लोकांना त्यांचे स्टेटस, प्रोफाइल पिक्चर आणि शेवटचे लास्ट सीन अनेक वर्षे लपवण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर, आता व्हॉट्सऍप तुम्हाला ऑनलाइन स्टेटस लपवण्याचा पर्यायही देत आहे. जे लोक व्हॉट्सऍपवर त्यांच्या उपस्थितीबद्दल कोणालाही सांगू इच्छित नाहीत त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरेल.
या फीचरच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा कोणालाही मेसेज करू शकता आणि तुम्ही तुमचे चॅट उघडल्यावर समोरच्या व्यक्तीला तुम्ही ऑनलाइन आहात की नाही हे कळणार सुद्धा नाही. आता, तुम्ही तुमच्या काही अवांछित मित्र आणि नातेवाईकांकडे सहजपणे दुर्लक्ष करू शकता. त्यांना तुम्ही ऑनलाइन आहात की ऑफलाइन हे देखील कळणार नाही.
ज्यांना त्यांची ऑनलाइन उपस्थिती खाजगी ठेवायची आहे, त्यांच्यासाठी हे फिचर असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. व्हॉट्सऍपने पुष्टी केली आहे की, ते या महिन्यात सर्व वापरकर्त्यांसाठी फिचर रोलआउट सुरू करतील.
Whatsapp वर ऑनलाइन स्टेटस कसे लपवायचे ?
व्हॉट्सऍपवर तुमचे ऑनलाइन स्टेटस लपवणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त व्हॉट्सऍप ओपन करायचे आहे. त्यानंतर सेटिंग्ज > अकाउंट > प्रायव्हसीवर जावे लागेल. येथे, तुम्हाला स्क्रीनच्या टॉपवर 'लास्ट सीन आणि ऑनलाइन' पर्याय दिसेल. फीचर वापरण्यासाठी तुम्हाला फक्त त्यावर टॅप करावे लागेल. ऑनलाइन स्टेटस सेक्शनमध्ये, Everyone' आणि 'Same as last seen' असे दोन पर्याय असतील. तुम्हाला तुमच्या हिशोबाने पर्याय निवडता येईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.