WhatsApp वर आले अप्रतिम फीचर, आता 1,000 हून अधिक लोक एकत्र सामील होणार

Updated on 11-Oct-2022
HIGHLIGHTS

WhatsApp ग्रुपवर एक हजारहुन अधिक लोक सामील होतील

WhatsApp वर नवीन फिचरची टेस्टिंग सुरु

तसेच, 'प्रिमियम' सदस्यता टेस्टिंग देखील सुरु

मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर सतत नवीन फीचर्सचा लाभ यूजर्सना मिळतो. आता त्याच्या ग्रुप मेसेजिंग सिस्टममध्ये मोठे बदल केले जात आहेत. यापूर्वी एका गटात केवळ 256 सदस्यांचा समावेश होता, तर आता कमाल सदस्यसंख्या 512 झाली आहे. नवीन अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की, ग्रुप सदस्यांची संख्या पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते आणि ती पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे.

हे सुद्धा वाचा : 8.5-इंच LCD आणि Stylus सह Redmi Writing Pad भारतात लाँच, किंमत फक्त 599 रुपये

इतर मेसेजिंग ऍप्सच्या तुलनेत व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये कमी सदस्यांचा समावेश केला जाऊ शकतो. मात्र, नव्या बदलांनंतर हा फरक संपणार आहे. हे उघड झाले आहे की, लवकरच 1,024 सदस्य व्हॉट्सऍपच्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकतील आणि या नवीन मर्यादेची सध्या टेस्टींग सुरु आहे. अशाप्रकारे, एकाच वेळी हजाराहून अधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि ग्रुप मेसेजिंगचा अनुभव अधिक उत्तम होणार आहे. 

बीटा व्हर्जनमध्ये टेस्टिंग सुरु

WABetaInfo, WhatsApp अपडेट्सची माहिती देणारे प्लॅटफॉर्म नुसार, मेटा-मालकीचे ऍप विद्यमान 512 सहभागींच्या गट मर्यादांमध्ये बदलांची चाचणी घेत आहे. आता ऍडमिनला एका ग्रुपमध्ये 1,024 सदस्य जोडण्याचा पर्याय दिला जात आहे. या फीचरची बीटा यूजर्ससोबत चाचणी केली जात असून निवडक बीटा यूजर्सना या फीचरचा लाभ मिळत आहे.

'प्रिमियम' सदस्यता टेस्टिंग सुरु

व्हॉट्सऍप बिझनेस वापरकर्त्यांसाठी प्रीमियम सेवेची टेस्टिंग केली जात आहे. निवडक वापरकर्त्यांना अनेक डेव्हलप्ड फीचर्सचा लाभ देत आहे. छोट्या आणि मोठ्या व्यवसायांना व्हॉट्सऍपवर प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेचा लाभ मिळेल, जेणेकरून ते अधिकाधिक ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकतील. मात्र, याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :