इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsAppने व्हिडिओ कॉलसाठी लिंक शेअर करण्याचा पर्याय आणला आहे. आता तुम्ही व्हॉट्सऍप ग्रुप कॉल किंवा मीटिंगच्या लिंक शेअर करू शकता. व्हॉट्सऍपने या नवीन फीचरला 'कॉल लिंक्स' असे नाव दिले आहे. तसेच ग्रुप कॉलमध्ये एकाच वेळी 32 सदस्यांचा समावेश देखील करता येईल. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सऍपवर आधीपासून सुरू असलेल्या मीटिंगमध्येही सहभागी होता येईल. आत्तापर्यंत हे फीचर गुगल मीट आणि झूम व्हिडिओ कॉलिंग ऍपवर उपलब्ध होते.
हे सुद्धा वाचा : Oppo ने गुपचूप 'हा' बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला, 7GB RAM सह मिळेल बेच काही…
अलीकडेच व्हॉट्सऍपच्या या फीचरची माहिती मेटा CEO मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. ते म्हणाले होते की, लवकरच व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 वापरकर्त्यांचा पर्याय उपलब्ध असेल म्हणजेच 32 लोक एकाच वेळी व्हिडिओ कॉल करू शकतील. तसेच मीटिंगची लिंकही शेअर करता येणार आहे.
व्हॉट्सऍपचे हे नवीन फीचर आधी बीटा टेस्टिंगसाठी जारी करण्यात आले होते, आता हे फीचर सर्व यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. याआधी व्हॉट्सऍपवर ग्रुप व्हॉईस कॉलसाठी 32 यूजर्सला जोडण्याची सुविधा आहे. आता हे फीचर व्हिडीओ कॉलसाठीही जारी करण्यात आले आहे.
नवीन अपडेटनंतर व्हॉट्सऍप यूजर्सना कॉल ऑप्शनमध्ये 'Create Call Links' नावाचा आणखी एक नवीन पर्याय मिळेल. या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला 'Send Link Via Whatsapp', Copy Link आणि Share Link चा पर्याय दिसेल. म्हणजेच, तुम्ही येथून थेट व्हॉट्सऍप ग्रुप कॉल लिंक शेअर करू शकता. तसेच, हा कॉल प्रकार येथे व्हॉइस आणि व्हिडिओमध्ये बदलला जाऊ शकतो. म्हणजेच, तुम्हाला व्हॉईस कॉल लिंक आणि व्हिडिओ कॉल लिंक दोन्ही शेअर करता येईल.