WhatsAppवर येणार नवीन फिचर, युजर्सच्या सुरक्षेसाठी व्हॉट्सऍपचे महत्त्वाचे पाऊल

Updated on 11-Jun-2022
HIGHLIGHTS

WhatsAppवर लवकरच डबल वेरिफिकेशन्स कोड फिचर येणार

नवीन फीचर अँड्रॉईड आणि IOS या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध

नवीन फीचरमुळे व्हॉट्सऍप आता जास्त सुरक्षित होणार

इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍप युजर्सच्या सेक्युरिटी आणि प्रायव्हसीसाठी नेहमीच नवे फिचर आणत असते. युजर्सच्या अकाउंटची संपूर्ण लॉगिन प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी व्हाॅट्सऍप डबल व्हेरिफिकेशन कोड फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, युजर्ससाठी अकाउंटमध्ये लॉग इन करताना सिक्युरिटीचे एक्सट्रा स्टेप्स जोडण्यासाठी काम करत आहे. हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि IOS या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असेल.

डबल व्हेरिफिकेशन कोड फीचर

Wabetainfo या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, या फीचरच्या मदतीने एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटमध्ये एकापेक्षा जास्त डिव्हाइस लॉग इन करण्यापूर्वी व्हेरिफाय करावे लागेल. फीचर सुरू केल्यानंतर, जेव्हा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दुसऱ्या डिव्हाइसमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला जुन्या डिव्हाइसवर सहा अंकी कोड मिळेल. तुम्हाला तुमच्या नवीन डिव्हाइसवर हा कोड टाकावा लागेल. हा कोड मॅच झाल्यानंतरच, तुम्हाला नवीन डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप लॉग इन करता येईल.

हे सुद्धा वाचा: BSNL च्या स्वस्त प्लॅनमध्ये बंपर डेटा, SonyLIV-ZEE5 देखील मोफत, बघा किंमत

सहा अंकी कोड व्हेरिफिकेशन कोडमुळे तुमचे अकाउंट जास्त सुरक्षित होणार आहे. जेव्हाही तुम्ही नवीन फोनवरून व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन कराल, तेव्हा चॅट लोड करण्यासाठी आणि बॅकअप घेण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर सहा अंकी कोड येईल. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट लॉगिनची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी या फिचरवर काम सुरु आहे. या डबल व्हेरिफिकेशन कोडचा उद्देश व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन प्रक्रिया मजबूत करणे आणि अकाउंटमधील वैयक्तिक माहिती आणि डेटाचा गैरवापर रोखणे हा होय.

रिपोर्टनुसार, हे फीचर आल्यानंतर, जेव्हा तुम्ही जुन्या व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन डिव्हाइसमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल. त्यामध्ये हे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट आधीपासून कोणत्या डिव्हाईसवर लॉग इन केलेले आहे, असे लिहिलेले असेल. त्यानंतर तुम्हाला नवीन डिवाइसवर व्हॉट्सअ‍ॅप लॉग इन करायचे असल्यास, जुन्या डिव्हाइसमध्ये पाठवलेला कोड नवीन डिव्हाइसवर टाकावा लागेल. अशा प्रकारे, समजेल की कोणीतरी आपल्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते दुसरा व्हेरिफिकेशन कोड शेअर करणार नाहीत. या नवीन फीचरमुळे तुमचे व्हॉट्सऍप अकाउंट अतिशय सुरक्षित होणार आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :