WhatsApp वापरकर्ते अनेक दिवसांपासून एका फिचरची खूप आतुरतेने वाट बघत होते. तो म्हणजे 'Edit Massage फिचर' होय. अलीकडे, WhatsApp सतत नवनवीन फिचर आणत आहे आणि लवकरच ऍनिमेटेड स्टिकर्स आणि इमोजीचे फिचर देखील ऍपवर येणार आहे. मात्र, कंपनीने नुकतेच जारी केलेले 'एडिट मेसेज' फीचर वापरकर्त्यांसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरणार आहे.
चॅटिंग करताना बरेचदा जे वापरकर्ते टाइप करताना चुका करतात. त्यांना त्यांचे मॅसेज सुधारण्यासाठी एडिट मॅसेज बटण उपयोगात येणार आहे. ताज्या अपडेटमध्ये WhatsAppवर पाठवलेले मेसेज एडिट करता येणार आहेत.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला मॅसेज एडिट करण्यासाठी 15 मिनिटे मिळतील. हे करण्यासाठी पाठवलेल्या मॅसेजवर लॉंग प्रेस करा आणि 'एडिट' पर्याय निवडा. यापूर्वी, वापरकर्ते 5 मिनिटांत मॅसेज एडिट करू शकतील, अशा चर्चा होत्या. मात्र, आता रोलआउट होण्यापूर्वीच ही वेळ वाढवण्यात आली आहे. तर, एडिट केलेल्या मॅसेजवर 'Edited' असे लेबल दिसणार आहे.
हे फिचर इतर दोन प्लॅटफॉर्म्स म्हणजेच Telegram आणि Instagram च्या फिचर सारखे आहे. या प्लॅटफॉर्म्सवर आधीपासूनच मॅसेज एडिट करता येतात. टेलीग्राममध्ये देखील एडिट केलेल्या मॅसेजवर संपादित स्थिती देखील समाविष्ट असते. तर इंस्टाग्रामवर मेसेज एडिट करण्यासाठी फक्त लाँग प्रेस, एडिट आणि सेव्ह अशा स्टेप्स कराव्या लागतात.