Whatsapp नेहमीच आपल्या युजर्सना खुश करण्यासाठी बरेच मनोरंजक फीचर्स आणत असतो. लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारला जाईल. आता ऍप एका फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे आधी पाठवलेले मेसेज एडिट केले जाऊ शकतात. म्हणजेच मेसेज पाठवल्यानंतर यूजर्स त्यात बदल करू शकतील. 'एडिट सेंट मेसेजेस' या नावाने हे फीचर पुढील अपडेट्समध्ये मिळण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : OnePlus Nord Watch लवकरच भारतात लाँच होणार, महिलांसाठी असतील खास फीचर्स
WABetaInfo ने म्हटले आहे की, नवीन एडिट मेसेज फीचर वापरकर्त्यांना मॅसेज पाठवल्यानंतर एडिट आणि अपडेट करण्याचा ऑप्शन देणार आहे. हे सध्या Google Play बीटा प्रोग्रामसह वर्जन 2.22.20.12 चा भाग बनले आहे. हे फिचर सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, व्हॉट्सऍप नवीन एडिट मेसेज फीचरवर काम करत आहे आणि वापरकर्त्यांना चूक झाल्यास डिलीट करण्याऐवजी त्यांनी आधी पाठवलेले मेसेज एडिट करण्याची संधी मिळेल. नवीन फीचरची रिलीज डेट अद्याप उघड करण्यात आलेली नाही. परंतु हे ऍप प्रथम बीटा वापरकर्त्यांसह त्याची टेस्टिंग करेल.
व्हॉट्सऍपवर एडिट मेसेज फीचर कसे काम करेल हे अद्याप स्पष्ट नाही. जुना मॅसेज एडिट करून चॅटचा अर्थ पूर्णपणे बदलला जाऊ शकतो. त्यामुळे एडिट मॅसेजसोबत 'एडिट' लेबल दिसण्याची शक्यता आहे. यासोबतच यूजर्सला एडिट हिस्ट्री पाहण्याचा पर्यायही मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. मेसेज पाठवल्यानंतर एडिट मेसेज फीचर मर्यादित काळासाठी दिले जाण्याची शक्यता आहे.