Whatsapp New Feature: आता व्हॉट्सऍपवर DND मिस्ड कॉल अलर्ट मिळेल, ‘असे’ करेल काम

Updated on 26-Sep-2022
HIGHLIGHTS

Whatsapp चे नवीन फिचर लवकरच येणार

WhatsApp वर तुम्हाला लवकरच डू नॉट डिस्टर्ब DND साठी मिस्ड कॉल अलर्ट फीचर मिळणार

WhatsApp 'companion मोड' फिचरची देखील चाचणी करणार आहे

इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp वर तुम्हाला लवकरच डू नॉट डिस्टर्ब DND साठी मिस्ड कॉल अलर्ट फीचर्स मिळणार आहेत. या फीचरच्या मदतीने यूजर्स DND मोड ऑन केल्यानंतर व्हॉट्सऍपवर मिस्ड कॉलची माहिती मिळवू शकतील. यासोबतच व्हॉट्सऍप आपल्या आणखी एका नवीन फीचर कंपेनियन मोडवरही काम करत आहे. व्हॉट्सऍपच्या नवीन फीचर्सचा मागोवा घेणारी वेबसाइट WABetaInfo ने ऍपच्या या आगामी फीचर्सबद्दल माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा : Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये इयरबड्सवर भारी सूट, पहा यादी

डू नॉट डिस्टर्ब मोड 'अशा'प्रकारे काम करेल

WABetaInfo नुसार, WhatsApp ने हे फीचर आणले आहे, परंतु अपडेट येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. दाव्यानुसार, वापरकर्त्यांना या फीचरमध्ये DND मोड चालू करण्याची सुविधा मिळेल. तसेच, DND मोडमधील मिस्ड कॉल्स देखील नंतर पाहता येतील. हे फीचर iOS बीटा वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. आता लवकरच ते अँड्रॉइड युजर्ससाठीही रिलीज केले जाण्याची शक्यता आहे.

companion मोड

WABetaInfo ने दावा केला आहे की, WhatsApp या फीचरची चाचणी करत आहे. मल्टी-डिव्हाइस सपोर्टच्या युगात हे फिचर सादर केले जाईल. या फीचरअंतर्गत यूजर्स एकच व्हॉट्सऍप अकाउंट अनेक स्मार्टफोन्समध्ये वापरू शकतील. नवीन अपडेटनंतर वापरकर्त्यांना Register Device as Companion पर्याय मिळेल, जेणेकरुन वापरकर्ते समान व्हॉट्सऍप खाते इतर फोनमध्ये देखील उघडू शकतील.

तेच WhatsApp खाते इतर उपकरणांमध्ये उघडण्यासाठी QR कोड स्कॅन करावा लागेल. हे स्कॅनिंग प्रायमरी फोनद्वारे होईल. युजर्सना प्रायमरी फोन व्यतिरिक्त त्या अकाउंटला दुसऱ्या फोन किंवा टॅबलेटमध्ये लॉग इन करण्याची सुविधा मिळेल.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :