अरे बापरे ! आता तुमचे WhatsApp चॅट कोणीही पाहू शकणार नाही, लावता येईल कुलूप ? कसे ते बघा
युजर्सच्या प्रायव्हसीसाठी WhatsAppचे पुढचे पाऊल
नव्या फिचरद्वारे पर्सनल चॅट लॉक करा
बघा स्टेप बाय स्टेप अगदी सोपी प्रोसेस
आपण नेहमीच बघतो की, जर कुणी आपला स्मार्टफोन जेव्हा दुसऱ्यांच्या हातात देतात. तेव्हा त्यांच्या मनात त्यांच्या पर्सनल गोष्टी कुणी बघू नयेत, याची भीती असते. बरेचदा अशी प्रकरणे तरुणाईसोबत होताना बघायला मिळतात. WhatsApp मध्ये युजरची बरीच वैयक्तिक माहिती लपलेली असते. त्यामुळे जर तुमचे WhatsApp कुणी बघितले तर ते तुमच्यासाठी धोक्याचे असू शकते. पण काळजी करू नका तुमची हीच भीती घालवण्यासाठी WhatsApp वर नवीन फिचर दाखल झाले आहे.
'चॅट लॉक' फीचर
आता WhatsApp वर एक 'चॅट लॉक' नावाचे फीचर आले आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे खाजगी चॅट लॉक करू शकता. ह्या चॅट्स पासवर्ड किंवा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनशिवाय उघडता येणार नाहीत.
WhatsApp वर चॅट लॉक कसे ऑन करता येईल ?
WhatsApp वर चॅट लॉक कसे एनेबल करता येईल याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया बघा :
– सर्वप्रथम तुम्हाला तुमचे WhatsApp अपडेट करण्याची आवश्यकता आहे.
– त्यानंतर WhatsAppमधील जी चॅट तुम्ही लॉक करू इच्छिता ती ओपन करा.
– प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा. यानंतर, तुम्हाला डीसअपायरिंग मॅसेज मेनूखाली चॅट लॉकचा पर्याय दिसणार आहे.
– हे पर्याय एनेबल करा आणि त्यानंतर पासवर्ड किंवा बायोमेट्रिकने ते ऑथेंटिकेट करा.
– आता तुमची वैयक्तिक चाट लॉक होईल आणि ते कुणीही बघू शकणार नाही.
टीप : जर WhatsApp अपडेट केल्यानंतरही तुम्हाला हे फिचर दिसत नसेल तर, काळजी करू नका. येत्या काही दिवसांत तुमच्या फोंर हे फिचर येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile