WhatsApp वर अनेक फीचर्स सातत्याने रोल आऊट होत आहेत. या नव्या फीचर्समुळे ॲप आणखी उपयुक्त आणि मजेशीर बनले आहे. दरम्यान, आता कंपनी आणखी एक फीचर आणत आहे, ज्यामुळे स्टेटस अपडेट करणे युजर्ससाठी आणखी मजेशीर होणार आहे. अलीकडेच WhatsApp ने स्टेटससाठी लाईक फिचर आणले होते.
Also Read: Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर लाँच! या स्मार्टफोन्सना मिळेल पॉवरफुल SoC, पहा यादी
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, WhatsApp वर स्टेटससोबत तुम्ही आता तुमच्या आवडीचे म्युझिक देखील ठेऊ शकता. होय, युजर्स ॲपमधील स्टेटस अपडेट पेजवर त्यांचे आवडते गाणे शोधू शकतील आणि ते त्यांच्या स्टेटसवर व्हिडिओ किंवा फोटोसह सहज शेअर करू शकतील. हे फिचर भविष्यातील अपडेटसह सादर केले जाईल. जाणून घेऊयात सविस्तर माहिती-
मेटाच्या-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp च्या आगामी फिचरवर लक्ष ठेवणारी वेबसाइट WAbetainfo ने आपल्या ताज्या अहवालात या फिचरचा तपशील शेअर केला आहे. त्याबरोबरच, प्रकाशकाने रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये हे फीचर दिसत आहे. तुम्ही खालील पोस्टमध्ये स्क्रिनशॉट पाहू शकता.
WhatsApp स्टेटस अपडेट्सद्वारे म्युझिक शेअर करण्यासाठी फीचरची देखील टेस्टिंग केली जात आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हे फिचर ऍपच्या आगामी अपडेटमध्ये जारी केले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे नवीन फीचर आल्यानंतर ड्रॉईंग एडिटरमध्ये एक म्युझिक बटण दिले जाईल. हा पर्याय स्टेटस अपडेट स्क्रीनच्या टॉपवर तुम्हाला दिसेल. शेअर करण्यासाठी फोटो किंवा Video निवडल्यानंतर हे पर्याय वापरकर्त्याला दिसेल.
पुढे, या बटणवर टॅप करून वापरकर्ते गाणे किंवा विशिष्ट कलाकार (आर्टिस्ट) शोधण्यात सक्षम असतील. ज्यामुळे त्यांचे आवडते म्युझिक शोधणे आणि स्टेटसमध्ये थेट जोडता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, लोकप्रिय Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर या प्रकारची सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे. Instagram स्टोरीजमध्ये तुम्ही व्हिडिओ आणि फोटोंसह म्युझिक सहज जोडू शकता, यासह तुमची स्टोरी किंवा स्टेटस सहज आकर्षक होतो.