WhatsApp वर येणार अनोखे फिचर ! मोबाईल नंबर सिस्टम येणार का संपुष्टात ?

Updated on 15-Mar-2023
HIGHLIGHTS

WhatsApp वर सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्स येत असतात.

यूजर्स अनोळखी नंबरवरून येणारा मेसेज सहज ओळखू शकतील.

संपर्कांना नंबरऐवजी युजरनेम दिसेल.

जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक, WhatsApp वर सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्स येत असतात. ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन ऍपवर अनेक फीचर्स आणले जातात. 

असेच एक अनोखे फीचर व्हॉट्सऍप यूजर्ससाठी सादर केले जाऊ शकते. व्हॉट्सऍप फीचर्स आणि अपडेट्सचा मागोवा घेणारी वेबसाइट Wabetinfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी चॅट्स आणि ग्रुप्समधील मोबाईल नंबर्सची सिस्टीम बंद करू शकते. या अपडेट अंतर्गत कंपनी मोबाईल नंबर बदलून यूजरनेम घेऊ शकते. 

हे सुद्धा वाचा : Jio चा नवीन पोस्टपेड फॅमिली प्लॅन लाँच, पहिल्या महिन्यात Jio Plus अगदी मोफत

WhatsApp च्या बीटा वर्जन 2.22.25.10 मध्ये एक अपडेट दिसले आहे, ज्यामध्ये मोबाईल नंबरऐवजी युजरनेम वापरण्यात आले आहे. या फीचरचा फायदा असा होईल की व्हॉट्सऍप यूजर्स अनोळखी नंबरवरून येणारा मेसेज सहज ओळखू शकतील, कारण नंबरऐवजी थेट नाव दिसणार आहे.

अज्ञात काँटॅक्ट्ससाठी, चॅट बबलमध्ये नंबरऐवजी नावे असतील, तर फोन नंबर दुसऱ्या लेबलवर असेल. रिपोर्टनुसार, या फीचरसह कंपनीचा प्लॅन युजरनेमचा प्रचार करण्यासाठी आहे. ही पहिली गोष्ट असेल, जी चॅटमध्ये दिसेल. म्हणजेच आगामी काळात मोबाईल क्रमांकाऐवजी युजरनेम दिसणे, अपेक्षित आहे. थोडक्यात यासाठी मोबाईल नंबर सिस्टम संपुष्टात येणार आहे. 

आम्ही तुम्हाला सांगतो की नवीन फीचर्स आणि अपडेट्स टेस्टिंगसाठी पहिल्या बीटा व्हर्जनवर रिलीज करण्यात आले आहेत. त्यांची स्थिरता आणि परफॉर्मन्स तपासल्यानंतर, सामान्य वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट्स आणि फीचर्स जारी केली जातात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :