जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप Whatsapp होय. हे ऍप जवळपास प्रत्येकाच्या फोनमध्ये तुम्हाला मिळेल. WhatsApp मुळे आपली बरीच कामे सोयीस्करपणे होतात, हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याद्वारे युजर कुठूनही लाईव्ह लोकेशन पाठवू शकतो, फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवता येते. बरेचदा WhatsApp वर आपण काही वैयक्तिक फोटो शेअर करत असतो. पण ते फोटो घरी किंवा इतर कुणालाही दिसू नयेत, ही भीती आपल्याला सतत असते. या लेखात आम्ही हीच भीती घालवण्यासाठी तोडगा घेऊन आलो आहोत.
बरेचदा असे होते की, आपण घरच्यांची फोटो घेतो आणि ते दाखवण्यासाठी फोन दुसऱ्यांच्या हाती द्यावा लागतो. अशात भीती वाटते की, कुणी तुमच्या फोनमधील गॅलरी बघू नये. कारण तिथे आपले बरेचसे वैयक्तिक फोटो असतात. यासाठी WhatsApp कडे एक जबरदस्त सेटिंग आहे, जेणेकरून तुमचे फोटोज गॅलरीमध्ये सेव्ह होणार नाही.
– सर्वप्रथम WhatsApp उघडा आणि मोअर ऑप्शनमध्ये जा.
– आता सेटिंगमध्ये 'चॅट्स' निवडा. येथे तुम्हाला Media Visibility चा पर्याय मिळेल.
– हा पर्याय तुम्हाला बंद करावा लागेल. यानंतर कोणताही फोटो गॅलरीत सेव्ह होणार नाही.
– हे फोटोज केवळ WhatsApp चॅट्समध्ये सेव्ह राहतील.
– एखादी चॅट किंवा ग्रुप चॅट ओपन करा.
– आता More Options वर जा, नंतर View Contact किंवा Group Info वर जा.
– आता Media Visibility वर जा, नंतर 'NO' सिलेक्ट करून 'OK' टॅप करा.