अनेकदा असे होते की, तुम्हाला कुणाला तरी WhatsApp वर काही शेअर करायचे आहे, पण तुम्हाला तुमचे नंबर चुकीच्या हातात जाण्याची भीती असते. ही भीती जर तुम्हाला देखील वाटत असेल तर काळजी करू नका. कारण WhatsApp ने युजर्सच्या प्रायव्हसीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता युजर्सच्या मोबाईल नंबरच्या जागी त्यांचे युजरनेम दाखवले जाणार आहे.
हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. हे फीचर सध्या डेव्हलमेंट मोडमध्ये आहे. जसे, युजर्स ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एखादे युनिक युजरनेम ठेवतात. तसेच, युनिक युजरनेम व्हॉट्सॲपसाठी देखील बनवावे लागेल. हाच युजरनेम व्हॉट्सॲपवर नंबरच्या जागी दिसेल. यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर एक्सचेंज करण्याची गरज उरणार नाही.
WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे. त्यावरून समजते की, WhatsApp वर ॲप सेटिंगमध्ये नवा युजरनेम मेनू लवकरच दिसू शकतो.
रिपोर्टनुसार, ॲपच्या सेटिंग्जमध्ये युजर्सना त्यांचे युजर नेम सेट करण्याचा पर्याय मिळेल. हा युजरनेम ॲप वर तुमची ओळख असणार आहे आणि यासह जुळलेल्या सर्व सेटिंग्ज प्रोफाइल सेक्शनमध्ये दिसणार आहेत. नव्या युजरनेमनंतर व्हॉट्सॲप वर तुमच्या फोन क्रमांकाची गरज उरणार नाही, असे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती आगामी काळात पुढे येईल.