Free चे दिवस गेले! WhatsApp युजर्सच्या खिशावर पडणार ताण, App चालवायला द्यावे लागतील पैसे? Tech News 

Free चे दिवस गेले! WhatsApp युजर्सच्या खिशावर पडणार ताण, App चालवायला द्यावे लागतील पैसे? Tech News 
HIGHLIGHTS

WhatsApp पैसे कमवण्याचे साधन वाढवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

WhatsApp वापरायचे असेल तर तुम्हाला जाहिराती पहाव्या लागतील.

या जाहिराती तुमच्या चॅटमध्ये दिसणार नाहीत, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

WhatsApp ने स्पष्ट केले आहे की, ते जास्त काळ मोफत सेवा देऊ शकत नाहीत. WhatsApp पैसे कमवण्याचे साधन वाढवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी जाहिराती दाखवण्याचे काम WhatsApp करू शकतो. मात्र, कंपनी सध्या सबस्क्रिप्शनचे ओझे लादणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु जर तुम्हाला WhatsApp वापरायचे असेल तर तुम्हाला जाहिराती पहाव्या लागतील, यासाठी युजर काहीही करू शकत नाही. सध्या दिलासा एवढाच आहे की, या जाहिराती तुमच्या चॅटमध्ये दिसणार नाहीत.

द्यावे लागतील पैसे?

सध्या तुमच्यासाठी काळजी करण्यासारखे काही नाही, परंतु हे निश्चित आहे की येत्या काही दिवसांत WhatsApp द्वारे सबस्क्रिप्शन ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे. ही ऑफर खासकरून अशा वापरकर्त्यांसाठी असेल, ज्यांना जाहिरातीशिवाय WhatsAppचा वापर करायचा आहे. भारतात जाहिरात सेवा कधी सुरू होणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही पुढे आलेली नाही. पण त्याची सुरुवात अमेरिका आणि कॅनडामधून होऊ शकते. त्यामुळे सध्या तरी भारतीयाना याबाबत चिंता करण्याचे काही कारण नाही.

whatsapp

WhatsApp वर दिसणार जाहिराती

WhatsApp च्या वतीने App मध्ये जाहिराती दाखवल्या जातील, असे लोकप्रिय मेसेजिंग ऍपच्या प्रमुख कॅथकार्टने स्पष्ट केले आहे. मुख्य इनबॉक्स चॅटमध्ये जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत, हे मात्र स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यन्त पुढे आलेल्या रिपोर्टनुसार App च्या दोन सेक्शनमध्ये जाहिराती दाखवल्या जातील. मात्र या दोन विभागांपैकी नक्की कोणत्या भागात ते दिसतील, याची माहिती सध्या उपलब्ध नाही.

या नव्या जाहिरात फिचरबद्दल बोलायचे झाल्यास, हे फिचर हे इन्स्टाग्राम स्टोरीज आणि फेसबुक स्टोरीजसारखे असेल. याचाच अर्थ असा की, आता ज्याप्रमाणे इंस्टाग्राम स्टोरीज आणि फेसबुक स्टोरीजमध्ये जाहिराती दिसतात. अशाप्रकारेच WhatsApp मध्ये सुद्धा जाहिराती दिसतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo