WhatsApp आता 21 नवीन इमोजींची टेस्टींग करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, ऍपच्या नवीन 21 इमोजींची चाचणी सध्या बीटा व्हर्जनवर केली जात आहे. व्हॉट्सऍपने बीटा वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सऍप कीबोर्डची नवीन आवृत्ती जारी केली आहे, ज्यामध्ये 21 नवीन इमोजी जोडल्या गेल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : Amazon Mega Electronics Days मध्ये उपलब्ध असलेले 5 सर्वोत्तम डिल्स
आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हॉट्सऍपने आता बीटा आवृत्तीसाठी जे 21 इमोजी जारी केले आहेत, ते आधीपासूनच थर्ड पार्टी कीबोर्डद्वारे वापरले जात होते. मात्र, थर्ड पार्टी कीबोर्डची समस्या ही होती की, वापरकर्ते हे ईमोजी रिसिव्ह करू शकत होते पण सेंड करण्यास सक्षम नव्हते.
ईमोजी तुमचे चॅट किंवा संवादाला एक रंजक स्वरूप देतात. जर तुम्हाला एखाद्याशी चॅट करायचे नसेल किंवा लवकर काय ती प्रतिक्रिया कळवायची असेल. तर, तुम्ही व्हॉट्सऍप वर उपलब्ध ईमोजीची मदत घेऊन तुमचे उत्तर किंवा भावना लवकरात लवकर सोप्या रीतीने व्यक्त करू शकता. दरम्यान, ऍपने आता अनेक नवीन ईमोजी जोडले आहेत. ते बघुयात…
https://twitter.com/WABetaInfo/status/1633989044311867400?ref_src=twsrc%5Etfw
याव्यतिरिक्त , WhatsApp आणखी एका नव्या फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सऍपवर दररोज येणाऱ्या स्पॅम कॉलमुळे लोक हैराण झाले आहेत. आता व्हॉट्सऍप आपल्या नवीन फीचर्ससह ही समस्या नाहीशी करणार आहे. साधारणपणे जगातील कोणाकडे तुमचा व्हॉट्सऍप नंबर असेल तर तो/ती तुम्हाला व्हॉट्सऍपवर कॉल करू शकतो. आता व्हॉट्सऍप त्यावर लगाम घालणार आहे. व्हॉट्सऍपचे नवीन फीचर स्पॅम आणि नको असलेले कॉल ब्लॉक करेल.