WhatsApp ने ‘या’ युजर्ससाठी आणले Special Feature, ऍपवरून सहज करता येईल UPI Payment

WhatsApp ने ‘या’ युजर्ससाठी आणले Special Feature, ऍपवरून सहज करता येईल UPI Payment
HIGHLIGHTS

तुम्ही लवकरच WhatsApp वर UPI Apps, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे पेमेंट करण्यास सक्षम असाल.

भारतात केवळ 100 दशलक्ष लोक WhatsApp पे वापरतात.

WhatsApp भारतीय ग्राहकांना एक नवीन आणि अप्रतिम सुविधा देणार आहे. खरं तर, लवकरच चॅट्स व्यतिरिक्त WhatsApp वर UPI पेमेंट देखील केले जाऊ शकते. तुम्ही लवकरच WhatsApp वर UPI Apps, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे पेमेंट करण्यास सक्षम असाल. Meta च्या मेसेजिंग कंपनीने Razorpay आणि PayU सोबत भागीदारी केली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

whatsapp payment

सध्या UPI ऍप्समध्ये Google Pay, PhonePe, Paytm आणि इतर समाविष्ट आहेत. आतापर्यंत व्हॉट्सऍपच्या बाहेर या ऍप्सद्वारे पेमेंट करता येत होते. 

भारतात सुमारे 500 दशलक्ष वापरकर्ते 

whatsapp payment

आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात सुमारे 500 दशलक्ष WhatsApp वापरकर्ते आहेत. नंतर यातील केवळ 100 दशलक्ष लोक WhatsApp पे वापरतात. आत्तासाठी, जिओमार्ट किराणा सेवेवर, चेन्नईतील मेट्रो प्रणाली आणि बंगळुरूमधील WhatsApp वर एंड-टू-एंड शॉपिंग अनुभव उपलब्ध आहे. मात्र, आता त्यात अनेक पेमेंट पर्याय जोडले गेले आहेत, त्यामुळे प्लॅटफॉर्मवर व्यवसायांना चालना देण्याचे संकेत मिळत आहेत. ही सर्व्हिस खास बिजनेस युजर्सना कामात येणार आहे. 

whatsapp payment

कंपनीने अधिकृतपणे दिली माहिती 

कंपनीच्या अधिकृत ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे की,''आम्ही तुमच्यासाठी एक नवीन फीचरवर काम करत आहोत. ज्याद्वारे तुम्ही चॅटिंग करताना शॉपिंगचाही अनुभव घेऊ शकता. आजपासून भारतात, WhatsApp ग्राहक नवीन प्रसिद्ध पेमेंट पर्यायासह UPI ऍप्स वापरून खरेदी केल्यानंतर पेमेंट करू शकतात. यामध्ये क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट देखील समाविष्ट करण्यात आले आहे. आम्हाला हे सांगायला देखील आनंद होत आहे की, यासाठी आम्ही Razorpay आणि PayU सोबत भागीदारी केली आहे.''

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo