Important! WhatsApp वरील फ्रॉड ग्रुपमध्ये ऍड झालात का? सावध करेल नवीन Context Cards फीचर

Important! WhatsApp वरील फ्रॉड ग्रुपमध्ये ऍड झालात का? सावध करेल नवीन Context Cards फीचर
HIGHLIGHTS

WhatsApp ने नवीन Context Cards सादर फिचर केले आहे.

नवे फीचर तुम्हाला अनोळखी WhatsApp ग्रुप्सशी संबंधित माहिती देईल, ज्यात तुम्हाला सामील करण्यात आले आहे.

WhatsApp हेड विल कॅथकार्ट यांनी त्यांच्या अधिकृत WhatsApp चॅनलद्वारे नव्या फीचरची केली घोषणा

WhatsApp Update: लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्सवर काम करत आहे. आता WhatsApp ने नवीन Context Cards सादर फिचर केले आहे. युजर्सच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीसाठी नवे फिचर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. हे फीचर तुम्हाला अनोळखी WhatsApp ग्रुप्सशी संबंधित माहिती देईल, ज्यामध्ये तुम्हाला अचानक ॲड केले गेले आहे. नव्या फिचरद्वारे अलर्ट मिळाल्यास तुम्ही लगेच सावध होऊ शकता.

Whatsapp new update

Also Read: 12GB RAM आणि 50MP कॅमेरासह लेटेस्ट Moto G85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

साधारणतः युजर्सना अनोळखी WhatsApp ग्रुप्सकडून चॅट इनव्हाइट्स मिळत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. आत्तापर्यंत, वापरकर्त्यांना ग्रुप फ्रॉड आहे की नाही? ही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे अशा फ्रॉड ग्रुप्सपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी नवीन Context Cards फीचर सुरू करण्यात आले आहे.

WhatsApp Context Cards फीचर

मेटाचे स्वामित्व असलेले WhatsApp हेड विल कॅथकार्ट यांनी त्यांच्या अधिकृत WhatsApp चॅनलद्वारे या नवीन Context Cards फिचरची घोषणा केली आहे. एवढेच नाही, WhatsApp च्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर देखील नव्या फिचरबद्दल पोस्ट शेअर केली गेली आहे.

फीचरबद्दल माहिती देताना WhatsApp हेड म्हणाले की, WhatsApp वर नवीन ग्रुप सेफ्टी फीचर जोडण्यात आले आहे. हे फीचर युजर्सना ज्या ग्रुपचे किंवा अनोळखी ग्रुपचे इन्व्हाईट अचानक मिळाले आहे. त्या ग्रुपशी संबंधित तपशीलवार माहिती देईल. कॉन्टेक्स्ट कार्ड्स फिचरद्वारे, वापरकर्ते त्यांना त्या अनोळखी ग्रुपमध्ये सामील व्हायचे की बाहेर पडायचे आहे, याबाबत सहज निर्णय घेऊ शकतील.

नवे Context Cards फीचर कसे काम करेल हे स्क्रीनशॉटमध्ये पाहिले जाऊ शकते. या नवीन कॉन्टेक्स्ट कार्ड्सद्वारे तुम्हाला कळेल की, ज्या व्यक्तीने तुम्हाला त्या ग्रुपमध्ये इन्व्हाईट केले आहे, ती तुमच्या संपर्कांपैकी आहे की नाही. जर एखाद्या गैर-संपर्काने तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केले असेल, तर तुम्ही ग्रुप सोडून डिलीट करू शकता. एवढेच नाही तर, तुम्हाला ग्रुप इनव्हिट केव्हा तयार केले आहे? याची सुद्धा माहिती मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo