इन्स्टंट मेसेजिंग ऍप म्हणून WhatsApp सर्वात जास्त वापरले जाते. वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्यासाठी कंपनी नवनवीन फिचर देखील जारी करत असते. आता WhatsApp Kept Messages फीचरवर काम करत आहे. रिपोर्टनुसार हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स केप्ट मेसेजेस चॅटमध्ये बुकमार्क करू शकतील.
हे सुद्धा वाचा : भारतीयांसाठी Appleचा मोठा निर्णय! देशात उघडणार पहिले रिटेल स्टोअर ?
WABetaInfo ने याबाबत वृत्त दिले आहे, यासाठी यूजरला आयकॉनचा पर्याय मिळेल. हे चिन्ह वापरकर्त्याच्या डिसअपियर झालेल्या मॅसेजसाठी व्हिज्युअल इंडिकेटर म्हणून काम करेल. यासह, वापरकर्त्यांना सूचित केले जाईल की, मॅसेज सेव्ह किंवा कॅप्चर झाला आहे आणि तो चॅटमधून डिसअपियर होणार नाही. हे फीचर लवकरच बीटा यूजर्ससाठी उपलब्ध होऊ शकते.
रिपोर्टनुसार, व्हॉट्सऍपचे हे अपडेट अँड्रॉईड आणि iOS दोन्ही बीटा यूजर्ससाठी उपलब्ध असेल. याशिवाय, हे डेस्कटॉप व्हर्जनसाठी देखील उपलब्ध असेल. WABetaInfo ने WhatsApp च्या Kept Messages फीचरचे प्रिव्ह्यू देखील दाखवले आहे.
रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केप्ट मॅसेजेस गायब झालेल्या मॅसेजला स्टॅंडर्ड व्हॉट्सऍप मॅसेजमध्ये रूपांतरित करेल. यासह, चॅट कालबाह्य झाल्यानंतरही वापरकर्ते ते ऍक्सेस करू शकतात. WhatsApp यासाठी Kept Messages चा वेगळा सेक्शन जोडू शकतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, डिसअपियरिंग मॅसेज हे एक ऑप्शन फिचरआहे. हे वापरकर्त्यांना अधिक प्रायव्हसी देते.जेव्हा वापरकर्ता डिसअपियरिंग मॅसेज ऑन करतो, तेव्हा सेट केलेल्या वेळेनंतर मॅसेज चॅटबॉक्समधून हटवले जातात.