आगामी फीचरच्या मदतीने यूजर्सना व्हिडिओ कॉल दरम्यान त्यांची स्क्रीन शेअर करता येणार आहे.
नेव्हिगेशन बारमध्ये एक नवीन आयकॉन जोडण्यात येणार असल्याचे समजते.
इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp सध्या अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. नुकतेच एडिट मॅसेज फिचर व्हॉट्सऍप ने लाँच केले आहे. त्यानंतर आता स्क्रीन शेअरिंग फीचरबद्दल माहिती पुढे येत आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्सना व्हिडिओ कॉल दरम्यान त्यांची स्क्रीन शेअर करता येणार आहे. WhatsApp च्या आगामी फीचर्सना ट्रॅक करणाऱ्या Webitainfo च्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
कोणत्या युजर्सना मिळणार स्क्रीन शेअरिंग फिचर ?
WhatsApp ने बीटा टेस्टर्ससाठी Android 2.23.11.19 अपडेट जारी केले आहे. या अपडेट अंतर्गत, टेस्टर्सना नेव्हिगेशन बारमध्ये नवीन टॅब प्लेसमेंटसह स्क्रीन शेअरिंग फिचर असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या फिचरद्वारे वापरकर्ते त्यांची स्क्रीन सहजरित्या शेअर करू शकतील.
वरील स्क्रीनशॉट पाहता, खाली नेव्हिगेशन बारमध्ये एक नवीन आयकॉन जोडण्यात येणार असल्याचे समजते. जेव्हा वापरकर्ता व्हिडिओ कॉल दरम्यान या बटणावर टॅप करेल, तेव्हा सिस्टम स्क्रीन कंटेंट रेकॉर्ड करेल. यासह स्क्रीन पुढील युजरला दिसेल.
मात्र, स्क्रीन शेअरिंग फीचर WhatsAppच्या जुन्या वर्जनसह ग्रुप व्हिडिओ कॉलला सपोर्ट करणार नाही, हे देखील अहवालात संगण्यात आले आहे. तसेच, WhatsApp ने स्क्रीन शेअरिंग फीचरच्या रिलीजबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. नव्या फीचरची टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर, हे फिचर सर्व स्थिर वापरकर्त्यांसाठी आणले जाईल, असे म्हटले जात आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.