इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsAppने नवीन ग्लोबल 'सिक्योरिटी सेंटर' पेज लाँच केले आहे. जे वापरकर्त्यांसाठी "स्पॅमर्स आणि अवांछित संपर्कांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे ?" याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वन-स्टॉप विंडो म्हणून काम करेल.
हे नवीन फिचर युजर्सना प्रायव्हसीच्या सर्व लेयर्सबद्दल माहिती देणार आहे, जे ऍपवर उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, युजर्सना आपल्या अकाउंटसह टू-स्टेप व्हेरिफिकेशन, स्कॅम आणि फेक अकाउंट्सना ओळखण्यासाठी आणि प्रायव्हसीबाबत सगळं काही मॅनेज करण्यासाठी टॉप टिप्स देते.
WhatsApp ने गुरुवारी सांगितले की, त्यांनी हे पेज अनेक सुरक्षा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि इनबिल्ट प्रोडक्टफीचर्स बद्दल तयार केले आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या सिक्योरिटीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करणार आहे. 'सिक्योरिटी सेंटर' केवळ इंग्रजीच नाही तर हिंदी, पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, मराठी, उर्दू आणि गुजरातीसह इतर 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.
कंपनीने पुढे म्हटले की, "एन्ड-टू-एंड एन्क्रिप्शनसह पर्सनल मॅसेजचे संरक्षण करणे हा घोटाळेबाज आणि फसवणुकीपासून संरक्षण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. WhatsApp लोकांची सिक्योरिटी आणि प्रायव्हसी वाढविण्यासाठी सतत नवनवीन मार्गांवर काम करत राहील."