WhatsApp : आता फोटोची कॉलिटी खराब होण्याचे टेन्शन नाही, पाठवता येतील HD Photos

Updated on 07-Jun-2023
HIGHLIGHTS

WhatsApp ने आपल्या यूजर्ससाठी HD फोटो फीचर आणले आहे.

यूजर्सना WhatsApp वरून फोटो पाठवताना कॉलिटी पर्याय मिळणार आहेत.

यानंतर फोटोवर HD लोगो देखील दिसणार आहे.

 लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍपमध्ये WhatsApp च्या माध्यमातून युजर्स एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात. मात्र, बरेचदा याद्वारे फोटो शेअर करणे म्हणजे त्याची कॉलिटी खराब होण्याची शक्यता जास्त असते. या समस्येमुळे युजर्स ऍपद्वारे फोटो शेअर करू शकत नाही. पण, आता काळजी करण्याचे कारण नाही, फोटो शेअरिंगचा अनुभव आणखी मजेदार बनवण्यासाठी कंपनी Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांना HD फोटो शेअर करण्याची परवानगी देत ​​आहे.

WhatsApp ने आपल्या यूजर्ससाठी HD फोटो फीचर आणले आहे. मात्र सध्या हे फिचर केवळ निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे.

WhatsApp HD फोटो फिचर

 

https://twitter.com/WABetaInfo/status/1666221155961692163?ref_src=twsrc%5Etfw

 

WABetainfo ने HD Photos फीचरच्या रोल आउटबद्दल माहिती दिली आहे. वापरकर्त्यांना एक नवीन पर्याय मिळेल, जो त्यांना फोटो कॉलिटी मॅनेज करण्याची परवानगी देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये यूजर्सना WhatsApp वरून फोटो पाठवताना कॉलिटी पर्याय मिळणार आहेत. 

खरं तर, फोटो निवडल्यानंतर स्क्रीनच्या टॉपला क्रॉप साइनजवळ HD सेटिंग बटण उपलब्ध असणार आहे. त्यावर क्लिक केल्यावर स्टँडर्ड कॉलिटी आणि HD कॉलिटी असे दोन पर्याय दिसतील. फोटोचे पिक्सेल रिझोल्यूशन स्टँडर्ड कॉलिटीमध्ये 1600 x 1052 आणि HD क्वालिटीमध्ये 4096 x 2692 असेल, असे सांगण्यात येत आहे.

जर वापरकर्त्यांना HD फोटो पाठवायचे असतील तर एचडी कॉलिटी पर्याय निवडवाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर 'Done' वर क्लिक करा. यानंतर फोटोवर HD लोगो देखील दिसणार आहे. आगामी काळात हे फिचर सर्वांसाठी आणले जाणार आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :