WhatsApp Edit Feature: खुशखबर ! आता लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरही मॅसेजमधील चुका सुधारता येतील

WhatsApp Edit Feature: खुशखबर ! आता लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरही मॅसेजमधील चुका सुधारता येतील
HIGHLIGHTS

ऍपने लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या काही बीटा टेस्टर्ससाठी Edit Message फिचर आणले आहे.

लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरही मिळेल 15 मिनिटांचा अवधी

एडिट बटनवर क्लिक करून मॅसेज एडिट केला जाऊ शकतो.

WhatsApp सतत दररोज चर्चेत आहे, कारण दररोज या ऍपवर नवनवीन फिचर येत आहेत. अलीकडेच व्हॉट्सऍपने आपल्या अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी Edit मॅसेज फिचर रिलीज केले आहे. त्यानंतर, एक पाऊल पुढे घेत ऍपने लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या काही बीटा टेस्टर्ससाठी Edit Message फिचर आणले आहे. त्याच्या मदतीने वापरकर्ते पाठवलेला मॅसेज एडिट करू शकतात. येत्या अपडेटसह सर्व वापरकर्त्यांसाठी हे फिचर रोलआउट केले जाणार आहे. WABetainfo ने या फिचरबद्दल माहिती दिली आहे. 

WhatsApp Edit Feature

या नव्या फिचरबद्दल बोलायचे झाल्यास, मेसेज मेनूमध्ये लोकांना आता रिप्लाय, कॉपी, फॉरवर्ड, स्टार, एडिट, डिलीट, सिलेक्ट आणि इन्फोचे पर्याय मिळणार आहेत. एडिट बटनवर क्लिक करून मॅसेज एडिट केला जाऊ शकतो. 

मिळेल 15 मिनिटांचा अवधी

जे लोक घाई घाईत चुकीचे मेसेज लिहितात त्यांच्यासाठी हे फिचर अतिशय उपयुक्त आहे. यासह तुम्हाला चुकीचा मॅसेज डिलीट करण्याची गरज नाही, फक्त एडिट करावे लागेल. मात्र, यासाठी त्यांच्याकडे केवळ 15 मिनिटांचा अवधी मिळणार आहे. 

नवे फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे, ज्यांनी लेटेस्ट WhatsApp अपडेट इन्स्टॉल केले आहे. आगामी अपडेटसह, हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo