WhatsApp च्या व्हीडिओ कॉलिंग फिचरमुळे वापरकऱ्यांचे संपर्कांसह कनेक्टेड राहणे अगदी सोपे झाले आहे. त्यात आता आणखी अप्रतिम अपडेट समाविष्ट करण्यात आले आहे. WhatsApp ने व्हिडिओ कॉलसाठी फिल्टर आणि बॅकग्राउंड रोलआऊट केले आहे. आता लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲपवर व्हिडिओ कॉल करताना तुम्हाला छान दिसण्यासाठी फिल्टर वापरता येईल. नव्या फीचरची टेस्टिंग बऱ्याच कालावधीपासून सुरु होती.
दरम्यान, आता अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हे फीचर सादर केले जात आहे. फिल्टरसह, आता वापरकर्ते झूम इत्यादी ॲप्स सारख्या व्हिडिओ कॉलवर बॅकग्रँड देखील बदलण्यास सक्षम असतील. जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नव्या फीचरबद्दल सविस्तर माहिती-
WhatsApp ने आपल्या एका ब्लॉग पोस्टद्वारे जाहीर केले आहे की, कंपनी व्हिडिओ कॉलिंग अधिक आकर्षक बनवण्यासाठी फिल्टर आणि बॅकग्राउंड हे नवे फिचर सादर केले आहे. या नवीन फीचर्ससह तुम्ही व्हीडिओ कॉलिंगदरम्यान आता तुमचे बॅकग्राउंड बदलू शकता. त्याबरोबरच, तुम्ही व्हिडिओ कॉल दरम्यान छान दिसण्यासाठी फिल्टर देखील जोडू शकता.
वापरकर्त्यांना 10 फिल्टर आणि 10 बॅकग्राउंडचा पर्याय मिळणार आहे. फिल्टर ऑप्शन्समध्ये वॉर्म, कूल, ब्लॅक अँड व्हाइट, लाइट लीक, ड्रीमी, प्रिझम लाइट, फिशये, विंटेज टीव्ही, फ्रॉस्टेड ग्लास आणि ड्युओ टोन यांचा समावेश आहे. बॅकग्राउंडमध्ये ब्लर, लिव्हिंग रूम, ऑफिस, कॅफे, पेबल्स, फूडी, स्मूश, बीच, सनसेट, सेलिब्रेशन आणि फॉरेस्ट समाविष्ट आहेत.
एवढेच नाही तर, कंपनी टच अप आणि लो लाइट ऑप्शन देखील जोडत आहे. यामध्ये वापरकर्त्याच्या वातावरणाचा लूक आणि ब्राइटनेस आपोआप वाढवून तुम्हाला अधिक चांगला व्हीडिओ कॉलिंग एक्सपेरिअन्स मिळेल. ज्यामुळे तुमचे व्हिडिओ कॉल आणखी मजेदार होतील.
विशेषतः फिल्टर फिचर तुमचे व्हीडिओ कॉलिंग वातावरण अधिक मजेदार तयार करण्यास मदत करेल. केवळ बॅकग्राउंडच नाही तर, तुम्ही तुमचा परिसर खाजगी ठेवू शकता. त्याचप्रमाणे, अधिक स्वच्छ आणि पॉलिश लूकसाठी कॅफे, लिव्हिंग रूम इ. चे वातावरण देखील तयार करू शकता. येत्या काळात प्रत्येकाला WhatsApp चे फिल्टर आणि बॅकग्राउंड फीचर मिळेल.