Facebook ची पॅरेंट कंपनी व्हाट्सऐप ने F8 developer Conference च्या कीनोट ने आपल्या आगामी प्रोडक्ट्स वरून पडदा हटवला आहे. त्याचबरोबर कंपनी ने काही मोठ्या घोषणा पण केल्या आहेत. या घोषणा फेसबुक आणि इन्स्टाग्राम संबंधित आहेत. तसेच कंपनी ने आशा एका धमाकेदार फीचर ची पण घोषणा केली आहे जो लवकरच तुम्हाला व्हाट्सॅप मध्ये मिळेल. या फीचर्स मध्ये पहिला फीचर तर तो आहे ज्याची खुप काळापासून वाट बघितली जात आहे. आम्ही “ग्रुप विडियो कॉलिंग फीचर” बद्दल बोलत आहोत, त्याचबरोबर व्हाट्सॅप मध्ये तुम्हाला लवकरच स्टीकर्स सपोर्ट पण मिळेल.
आशा काही बातम्या इंटरनेट वर ऐकायला मिळत आहेत की कंपनी ने ग्रुप विडियो कॉलिंग प्लॅटफार्म वर पण काम चालू आहे. पण आता समोर येत आहे की या बातमी वर कंपनी ने शिक्कामोर्तब केला आहे. त्याचबरोबर स्टीकर सपोर्ट मिळाल्यावर तुमच्या रोजची इंटरॅक्ट करण्याची पद्धत बदलेले.
कंपनी ने आपल्या एका ब्लॉगपोस्ट मध्ये सांगितले आहे की, “वॉयस आणि विडियो कॉलिंग फीचर व्हाट्सॅप वर खुप प्रसिध्द आहेत आणि आता आम्ही आमच्या यूजर्सना एक नवीन फीचर देत आहोत, आगामी काही महिन्यांमध्ये हा फीचर यूजर्सना मिळणे सुरू होईल.”
आता काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला सांगितले होते की आता तुम्ही व्हाट्सॅप वर जाऊन आपल्या पर्सनल डाटा साठी रिक्वेस्ट करू शकता आणि हा डाउनलोड पण करू शकता. या फीचर वर जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हाट्सॅप अकाउंट वर टॅप करा, तुम्ही ‘रिक्वेस्ट रिपोर्ट’ वर रिक्वेस्ट अकाउंट इन्फो मध्ये जाऊन क्लीक करताच तुम्हाला स्क्रीन वर हा मेसेज दिसेल की तुमचा मेसेज सेंड झाला आहे.
त्यानंतर हा डाटा रिपोर्ट तुम्हाला तीन दिवसांमध्ये पाठवला जाईल. एकदा रिक्वेस्ट केल्यावर तुम्ही कँसल करू शकत नाही. पण ही रिक्वेस्ट व्हाट्सॅप त्या यूजर साठी रद्द करतो जे लगेचच आपले अकाउंट डिलीट करतील किंवा आपला नंबर बदलतील किंवा पुन्हा एकदा आपले अकाउंट रजिस्टर करतील.
या रिपोर्ट साठी रिक्वेस्ट करताच तुम्हाला तीन दिवसांच्या आत एक मेसेज मिळेल की तुमचा डाटा डाउनलोड साठी तयार आहे, आणि तुम्ही हा डाउनलोड करू शकता. हा डाटा डाउनलोड करताच काही वेळाने हा डाटा व्हाट्सॅप वरून डिलीट होईल.