तुम्ही WhatsApp ग्रुप्सच्या गर्दीला कंटाळला आहात का? तर आता काळजी करू नका. ही समस्या सोडवण्यासाठी कंपनी नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. अनेकदा आपण पाहतो की वापरकर्ते वाढदिवस, लग्न किंवा इतर कोणत्याही खास प्रसंगी एखादे ग्रुप तयार करतात. पण हा कार्यक्रम संपला की हे ग्रुप असेच बरेच दिवस पडून असतात. पण नवीन फिचरद्वारे तुम्हाला ही समस्या उरणार नाही. कसे ते बघुयात…
हे सुद्धा वाचा : Xiaomi 13 Pro ची पहिली सेल आज, थेट 10 हजारांच्या सवलतीसह खरेदी करा फोन
WhatsApp ग्रुपच्या एक्सपायरी डेट फीचरवर सध्या काम सुरू आहे. तयार झाल्यास, हे फिचर ऍपच्या आगामी अपडेट्समध्ये जारी केले जाईल. मात्र, WhatsApp ने या फीचरबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
– यूजर्सना WhatsApp ग्रुप इन्फोमध्ये एक्सपायरीचा ऑप्शन मिळेल.
– फिचर रिलीज झाल्यानंतर, वापरकर्ते ग्रुपसाठी एक्सपायरी डेट निवडण्यास सक्षम असतील.
– वापरकर्ते एक दिवस, एक आठवडा किंवा एक महिन्यानंतर एक्सपायरी निवडण्यास सक्षम असतील.
– व्हॉट्सऍप वापरकर्त्यांना एक्सपायरी डेट बदलण्याचा पर्यायही देईल.
– एक्सपायरी डेट आल्यावर युजर्सला ग्रुप डिलीट करण्याची सूचना मिळेल.
या फिचरमुळे ग्रुप डिलीट करण्याची केवळ सूचना मिळणार आहे. हे फिचर ग्रुप आपोआप हटवणार नाही, त्यामुळे वापरकर्त्यांना गट हटवावा लागेल किंवा बाहेर पडावे लागेल.