आता ही सेवा व्हॉट्सअॅप मनीच्या चॅट एन्ड पे फीचरसह उपलब्ध आहे. ह्या चॅट एन्ड पे च्या नवीन फीचरसह आपण आपल्या व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्समधील कोणालाही अगदी काही मिनिटातच पैसे पाठवू शकता.
आजकाल व्हॉट्सअॅप हा सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. आपण प्रत्येक दिवशी आपल्या मित्रांशी आणि परिचित लोकांशी व्हॉट्सअॅप चॅट करतो. मात्र आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पैसेसुद्धा ट्रान्सफर केले जातील. हो, आपण योग्य ऐकलात. आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपण पैसे पाठवू शकता. ह्या सेवेला ह्यासाठी बनवले गेले आहे, कारण आजच्या काळात सर्वच जण व्हॉट्सअॅपचा वापर करताना दिसतायत. .
खरे पाहता पेमेंट प्लेटफॉर्म फ्रीचार्जने व्हॉट्सअॅपसह टाय-अप केला आहे आणि आता यूजर्स व्हॉट्सअॅपने पैसेसुद्धा ट्रान्सफर करु शकतील. आता ही सेवा व्हॉट्सअॅप मनीच्या चॅट अँड पे फीचरसह उपलब्ध आहे. ह्या चॅट एन्ड पे च्या नवीन फीचरसह आपण आपल्या व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्समधील कोणालाही अगदी काही मिनिटातच पैसे पाठवू शकता आणि पैसे मागवूही शकता. त्याचबरोबर फ्रीचार्ज व्हॉट्सअॅपला केवळ एक माध्यम बनवून यूजर्सला ही सेवा प्रदान करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्यातरी हे फीचर फ्रिचार्ज यूजर्सला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दिले जाईल आणि हे फीचर केवळ फ्रिचार्ज अॅनड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनीनुसार, हा व्हॉट्सअॅपचा कोणताही फीचर नाही, तर फ्रीचार्ज व्हॉट्सअपला केवळ एक माध्यम बनवून यूजर्सला ही सेवा प्रदान करत आहे. आता ह्या फीचरला आणल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना ह्याचा खूप फायदा होणार आहे. सर्वसामानय लोक अगदी सहजपणे एकमेकांना पैसे पाठवू शकतील.