जर तुम्हाला वर्षभरात तुमच्या खास व्यक्तीला मनापासून काहीतरी सांगायचे असेल, तर व्हॅलेंटाईन वीक आणि व्हॅलेंटाईन डे ही तुमच्यासाठी खास संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. आजकाल प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत घेतो. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी Whatsapp ने तुमच्यासाठी खास फीचर्स आणले आहेत. जाणून घेऊया काय आहेत WhatsApp चे खास फीचर्स…
हे सुद्धा वाचा : केवळ 91 रुपयांमध्ये Jio प्रीपेड प्लॅन, अमर्यादित कॉलिंगसह मिळेल दररोज डेटाची सुविधा
WhatsApp तुम्हाला तुमचा स्वतःचा डिजिटल अवतार तयार करण्यात मदत करते. व्हॉट्सऍपच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही तुमचा डिजिटल अवतार किंवा कार्टून तयार करू शकता. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत ते तयार केले तर ते अधिक खुश होतील. तुम्ही हे अवतार चॅटमध्ये स्टिकर म्हणूनही वापरू शकता.
तुम्ही या व्हॅलेंटाईन डे वर तुमच्या जोडीदारासाठी कस्टम नोटिफिकेशन टोनसेट करू शकता. याच्या मदतीने तुम्ही त्यांचे कॉल आणि मेसेज सहज ओळखू शकता. अशा प्रकारे, त्याचे कोणतेही कॉल किंवा मॅसेज इग्नोर होण्याची शक्यता खूपच कमी असेल.
हे फिचर खूप मजेदार आहे. जर, तुम्ही तुमच्या जोडीदाराला काय गिफ्ट द्यायचे हे ठरवू शकत नाही का? त्यामुळे तुम्ही व्हॉट्सऍपवर पोल वापरू शकता आणि तुमच्या मित्रांकडून सल्ला घेऊ शकता.
जर तुमच्यावर व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमच्या जोडीदाराकडे योग्य लक्ष न दिल्याचा आरोप होत असेल, तर असे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी इमोजी हा सर्वोत्तम मार्ग आहे. WhatsApp तुम्हाला इमोजी प्रतिक्रियांच्या मदतीने मॅसेजेस इंटरेस्टिंग बनवण्याची सुविधा देतो.
तुम्ही तुमची स्टेटस व्हॉट्सऍपवरही शेअर करू शकता. मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp च्या स्टोरी वर तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी रोमँटिक मेसेज, व्हिडिओ किंवा फोटो टाकू शकता.