WhatsAppवर फोटो आणि व्हिडीओ फॉरवर्ड करायचंय ? मग ‘या’ फिचरबद्दल नक्की जाणून घ्या

WhatsAppवर फोटो आणि व्हिडीओ फॉरवर्ड करायचंय ? मग ‘या’ फिचरबद्दल नक्की जाणून घ्या
HIGHLIGHTS

WhatsAppच्या नवीनतम फीचरमध्ये कॅप्शनसह फॉरवर्ड मीडियाची घोषणा

हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी सुरु करण्यात आले आहे.

WhatsApp काही आगामी आणि महत्त्वाच्या फीचरवरही काम करत आहे.

इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsAppने वापरकर्त्यांच्या सोयीसाठी नवीन फीचर आणले आहे. या फीचरमध्ये यूजर फोटो आणि व्हिडिओवर कॅप्शन पाठवू शकतो. व्हॉट्सऍपच्या नवीनतम फीचरमध्ये कॅप्शनसह फॉरवर्ड मीडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी सुरु करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, या फीचरमुळे यूजर्स कॅप्शनसह फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करू शकतील.

हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy Unpacked इव्हेंटची अधिकृत तारीख जाहीर, वाचा संपूर्ण डिटेल्स…

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp आता युजर्सना फोटो आणि व्हिडीओ फॉरवर्ड करण्यापूर्वी फोटो आणि व्हिडिओंमधून कॅप्शन काढून टाकण्याची सुविधाही देत ​​आहे. हे फिचर प्रथम iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले गेले होते, परंतु आता ते Android वापरकर्त्यांसाठी देखील आले आहे. हे वापरकर्त्यांना कॅप्शनसह GIF, व्हिडिओ आणि इतर मीडिया फाईल्स पाठविण्याची परवानगी देते.

'अशा'प्रकारे कार्य करतो नवीन फिचर 

नवीनतम फिचर वापरकर्त्यांना मीडिया फाइल्समध्ये कॅप्शन जोडण्यास आणि कॅप्शनमधून कीवर्ड सर्च करून जुन्या फाइल्स शोधण्याची परवानगी देईल. हे फीचर तुमच्या व्हॉट्सऍपवर काम करत आहे की नाही हे तुम्हाला तपासायचे असेल, तर कॅप्शन असलेली मीडिया फाइल फॉरवर्ड करा. त्यानंतर स्क्रीनच्या तळाशी एक नवीन व्ह्यू दिसेल. यावरून तुम्हाला कळेल की हे फीचर सुरू आहे की नाही. याशिवाय, हे फिचर डिसमिस बटनसह येते, म्हणजेच आता वापरकर्ता कोणतीही मीडिया फाइल फॉरवर्ड करण्यापूर्वी कॅप्शन काढून टाकू शकतो.

आगामी फिचर 

रिपोर्टनुसार, WhatsAppआता 'केप्ट मॅसेज' फीचरवरही काम करत आहे. या फीचरमध्ये यूजर्स आता व्हॉट्सऍप चॅटमधील गायब होणाऱ्या मेसेजवर नियंत्रण ठेवू शकतात. वापरकर्ते आता मेसेज कधीही अन-कीप करू शकतात आणि तो मेसेज चॅटमधून कायमचा डिसअपियर करू शकतात. सध्या ही सुविधा सुरू झालेली नाही, भविष्यात हे फीचर युजर्ससाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo