तुम्ही जर iPhone यूजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, Whatsappवर नवीन फीचर एडिट फीचर आणले जात आहे. हे फीचर खासकरून iOS युजर्ससाठी आणले जात आहे. जे नंतर Android वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध केले जाऊ शकते. याचा अर्थ तुम्ही Apple डिव्हाईसवर व्हॉट्सऍप चालवत असाल तर तुमच्यासाठी व्हॉट्सऍपकडून नवीन एडिट फीचर सादर केले जात आहे.
Whatsapp वरील ग्रुप किंवा वैयक्तिक मॅसेजमध्ये अनेकदा आपण चुका करतो. नवीन फीचरमध्ये चूक सुधारण्याची संधी दिली जाईल. म्हणजे तुम्ही वेळेत व्हॉट्सऍप मॅसेज एडिट करू शकाल. म्हणजेच, चुकीचा व्हॉट्सऍप मॅसेज पाठवल्यानंतर आता लाजिरवाणे वाटून घेण्याची गरजचं उरणार नाही.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर iOS उपकरणांसाठी आणले जाईल. याच्या मदतीने यूजर्स त्यांचे मेसेज एरर फ्री करू शकतील. मॅसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांत मेसेज एडिट करण्याची सुविधा व्हॉट्सऍप देणार आहे. तोच मेसेज एडिट केल्यावर त्या मेसेजवर एडिट लेबल दिसेल. मॅसेज एडिट फिचर अजूनही विकसित होण्याच्या टप्प्यात आहे. हे नवे आणि महत्त्वाचे फिचर कधीपर्यंत आणले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, Whatsapp ने प्लॅटफॉर्मवर अधिकृत चॅट सुरू केले आहे, जिथे वापरकर्ते ऍपशी संबंधित अधिकृत तपशील मिळवू शकतील. यात अपडेट तसेच iOS आणि Android वापरण्याच्या टिप्स तुम्हाला मिळतील.