WhatsApp ने अखेर आपला बहुप्रतीक्षित फिचर म्हणजे Edit Feature लाँच केला आहे. युजर्स बऱ्याच कालावधीपासून या फिचरची वाट बघत आहेत. आतापर्यंत जर चॅटिंग करताना एखादी स्पेलिंग चुकली तर तुम्हाला ते मॅसेज डिलीट करून परत लिहावे लागत होते. पण आता तसे करायची गरज नाही, कारण नव्या फिचरद्वारे तुम्हाला चुकीचा मॅसेज एडिट करता येईल.
एक नवे अपडेट पुढे आले आहे, ज्यामध्ये कंपनीने हे फीचर iPhone यूजर्ससाठी रोलआऊट केले आहे, असे सांगण्यात येत आहे. WhatsApp ने माहिती दिली की, चुकीचा मॅसेज सुधारण्यासाठी आम्ही एक नवीन फिचर आणले आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. तुम्हाला फक्त सेंट मॅसेजवर लॉन्ग प्रेस करावे लागेल आणि त्यानंतर मेनूमधून 'Edit' पर्याय निवडा.
– सर्वप्रथम चुकीचे मॅसेज निवडा आणि टॅप करा. यानंतर हा मॅसेज हायलाइट केला जाणार आहे आणि मेनू उघडेल.
– iOS वर 'Edit' पर्यायावर टॅप करण्यासाठी मेनूवर जा. तर, अँड्रॉइडवर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन-डॉट दिसतील मेनू साइनवर टॅप करा.
– आता तुम्ही निवडलेल्या मॅसेजवर एडिट पर्यायावर टॅप करा. त्यानंतर टेक्स्ट फील्डमध्ये तुम्हाला पाठवायचा असलेला नवीन मॅसेज टाइप करा.
– एकदा तुम्ही मॅसेज एडिट केल्यास, टेक्स्ट बॉक्सच्या शेजारी असलेल्या ग्रीन चेक मार्क बटणवर टॅप करा. अशाप्रकारे तुमचा एडिट मॅसेज सेव्ह होईल.
लक्षात ठेवा की, मॅसेज पाठवल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची चूक सुधारून नवा मॅसेज सेव्ह करायचा आहे. म्हणजेच, तुम्हाला मसेज एडिट करण्यासाठी केवळ 15 मिनिटांचा अवधी मिळणार आहे. तसेच, एडिट केल्यास मॅसेजवर 'edited' असा लेबल दिसणार आहे.