WhatsApp स्टेटस फीचरमध्ये लवकरच एक नवीन Disappearing ऑप्शन येईल.
काही काळानंतर हे टेक्स्ट युजर्सच्या प्रोफाइलमधून आपोआप गायब होतील.
WhatsApp मेसेजिंग ऍप आता दोन नवीन शॉर्टकट फीचर्स सादर करण्याच्या तयारीत आहे.
WhatsApp वर लवकरच एक नवीन चॅट लॉक शॉर्टकट येणार आहे, ज्याद्वारे वापरकर्ते सहजपणे वैयक्तिक चॅट लॉक करू शकतील. दरम्यान, आणखी एका ताज्या लीकमध्ये माहिती मिळाली आहे की, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म स्टेटस फीचरमध्ये लवकरच एक नवीन Disappearing ऑप्शन जोडला जाणार आहे. या नवीन पर्यायामध्ये WhatsApp वर वापरकर्त्यांनी पोस्ट केलेले स्टेटस काही वेळाने आपोआप डिलीट होतील. चला तर मग आगामी फिचरबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Disappearing ऑप्शन
Wabetainfo च्या ताज्या अहवालात माहिती देण्यात आली आहे की, नव्या अपडेटमध्ये युजर्सना स्टेटस फीचर अंतर्गत डिसअपियरिंग असा नवीन ऑप्शन मिळणार आहे. नावावरून समजलेच असेल की, या फीचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे टेक्स्ट WhatsApp स्टेटस काही काळासाठी पोस्ट करू शकतात. काही काळानंतर हे टेक्स्ट त्यांच्या प्रोफाइलमधून आपोआप गायब होणार आहेत. हे फिचर डिसअपियरिंग मॅसेज फीचरसारखेच काम करणार आहे.
सध्या हे फिचर केवळ काही iOS बीटा टेस्टर्सना प्राप्त झाले आहे. बीटा चाचणीनंतर, हा फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जाऊ शकते.
याबाबत एक रिपोर्ट देखील Wabetainfo ने शेअर केली आहे. त्या रिपोर्टमध्ये एक स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे. युजर्सना स्टेटस ऑप्शनमध्ये नवीन टायमर सेक्शन मिळणार आहे. या सेक्शनमध्ये वापरकर्त्यांना 24 तास, 3 दिवस, 1 आठवडा आणि 2 आठवडे टायमर ऑप्शन्स मिळतील. या टाइम पिरेडनंतर स्टेटस आपोआप रिमूव्ह होतील.
WhatsApp वर येणार आगामी फीचर्स
WhatsApp मेसेजिंग ऍप आता दोन नवीन शॉर्टकट फीचर्स सादर करण्याच्या तयारीत आहे. या शॉर्टकट्सच्या मदतीने, वापरकर्ते त्यांचे वैयक्तिक चॅट सहजपणे लॉक करू शकतील. वैयक्तिक चॅट लॉकसह, चॅट लपवण्याचा एक नवीन मार्ग देखील इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर येत आहे. प्रोफाइलमधून वैयक्तिक चॅट लपवल्या जाऊ शकतात. यासाठी नवीन सिक्रेट कोड फीचर देखील येणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.