WhatsApp ने काही काळापूर्वी डिसअपियरिंग मॅसेज फिचर आणले होते. या फीचरद्वारे तुमचे चॅट्स 24 तासानंतर आपोआप हटविले जातात. तर, आता यामध्ये प्रायव्हसीसाठी आणखी पर्याय जोडले जात आहे. नव्या फिचरमध्ये युजर चॅटमधील एखादा मॅसेज जास्त काळापर्यंत ठेवण्यास सक्षम आहे. यूजर आता डिसअपियर होणाऱ्या मॅसेजसाठी नवे अपडेट आणत आहे. जो सिलेक्टड मॅसेजला हटू देणार नाही.
या फीचरचा अपडेट गायब होणाऱ्या चॅट विंडोमध्ये एक नवा बुकमार्क आयकॉन जोडतो. यामुळे युजर्सना काही मॅसेज सिलेक्ट करून बुकमार्क करता येतात, म्हणजे मॅसेज हटविले जाणार नाहीत. तसेच, अनकीप आयकॉन सिलेक्ट केल्यास मॅसेज सेव्ह होणार नाहीत. नवीन अपडेट एक तास, दोन दिवस, सहा दिवस, तीन दिवस, साठ दिवस, एक वर्ष इ. 15 कालावधी ऑफर करेल.
कीप चॅट फिचर काही महत्त्वाचे मॅसेज सेव्ह करून ठेवण्यासाठी युजर्सना खूप फायदेशीर ठरणार आहे. तसेच, WhatsApp मॅसेज गायब डीसअपियर होणाऱ्या मॅसेजसाठी टायमर सेट करण्याचीदेखील परवानगी देतो. नवीन कीप चॅट फीचरमुळे ग्राहकांना त्यांच्या चॅटवर अधिक नियंत्रण ठेवता येईल. त्यामध्ये वापरकर्त्यांना केवळ तेच मॅसेज सेव्ह करता येतील, जे महत्त्वाचे आहेत.
WhatsApp मॅसेज डिसअपियर होणाऱ्या मॅसेजसाठी 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवस असे तीन टायमर देण्यात आले आहे. त्यानंतर ऍप आपोआप मॅसेज क्लियर करतो. एखाद्या मॅसेजला ठेवण्यासाठी तुम्हाला त्या टेक्स्ट बबलवर लॉन्ग प्रेस करावे लागेल. यानंतर तुम्हला Keep नावाचा पर्याय मिळेल.