इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp च्या करोडो यूजर्सचा डेटा हॅकर्सनी चोरला आहे. भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि इजिप्तसह 84 देशांतील युजर्सचा डेटा हॅक करून ऑनलाइन विकला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. जगभरातील सुमारे 487 दशलक्ष वापरकर्त्यांचा डेटा हॅक झाला आहे. हॅक झालेल्या डेटामध्ये 84 देशांतील व्हॉट्सऍप वापरकर्त्यांचे मोबाइल नंबर देखील आहेत, त्यापैकी 61.62 लाख फोन नंबर भारतीयांचे आहेत.
हे सुद्धा वाचा : 300 रुपयांच्या आत JIO, AIRTEL, VI आणि BSNL चे सर्वोत्तम प्लॅन्स बघा
अहवालानुसार, हॅकिंग कम्युनिटी फोरमवर जाहिरातीद्वारे 487 दशलक्ष व्हॉट्सऍप वापरकर्त्यांच्या मोबाइल नंबरच्या विक्रीचा दावा करण्यात आला आहे. हा 2022 चा नवीनतम डेटा असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारचा डेटा बहुतेक फिशिंग अटॅक्समध्ये वापरला जातो. तसेच हे नंबर मार्केटिंगमध्ये वापरले जाऊ शकतात. विशेषत: वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर वापरकर्त्यांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी कॉल करण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी करू शकतात. मात्र, सर्वात मोठा धोका म्हणजे फिशिंग आणि फसवणूक होय.
जगभरातील सुमारे 84 देशांतील युजर्सचा डेटा हॅक करण्यात आला आहे. 84 देशांपैकी सर्वाधिक 4.48 कोटी युजर्सचा डेटा इजिप्तचा आहे. यानंतर इटलीचे 3.53 कोटी, अमेरिकेचे 3.23 कोटी, सौदी अरेबियाचे 2.88 कोटी आणि फ्रान्सचे 1.98 कोटी युजर्सचा डेटा समाविष्ट आहे. हॅक झालेल्या वापरकर्त्यांच्या यादीत भारत 25 व्या क्रमांकावर आहे.