लवकरच येईल WhatsApp Dark Mode, बघा कसा करता येईल याचा वापर

Updated on 28-Jan-2019
HIGHLIGHTS

लवकरच इन्स्टंट मेसेजिंग ऍप वॉट्सऍप dark mode फीचर आणणार आहे. हा फीचर एंड्राइड यूजर्स सह iOS यूजर्स साठी आणण्याची तयारी चालू आहे. रिपोर्ट्सनुसार हा फीचर कंपनी गूगलच्या Android Q च्या घोषणे आधी आणू शकते.

महत्वाचे मुद्दे:

  • WhatsApp ने सुरु केले फीचर वर काम
  • iOS यूजर्स साठी आधी येऊ शकतो हा फीचर
  • Android Q च्या घोषणेच्या अर्धे येऊ शकतो हा फीचर

 

WhatsAppयूजर्स साठी लवकरच हा ऍप एक नवीन आणि खूप उपयोगी फीचर आणणार आहे. यूजर्स साठी आता लवकरच Dark mode फीचर येणार आहे. अलीकडेच काही लीक रिपोर्ट्स मधून माहिती मिळाली आहे कि कंपनी या फिचर वर काम करत आहे आणि हा लवकरच रोल आउट करण्याचा विचार केला जात आहे. लीक रिपोर्ट्स मध्ये असा पण खुलासा झाला आहे कि कशाप्रकारे हा नवीन फीचर यूजर्सच्या उपयोगी पडेल किंवा कशाप्रकारे यूजर्स याचा वापर करू शकतील. रिपोर्ट्सनुसार Dark mode एंड्राइड यूजर्स साठी कंपनी गूगल कडू करण्यात येणाऱ्या Android Q च्या घोषणेच्या आधीच रोल आउट करू शकते अशी पण माहिती मिळाली आहे.

आजकाल तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या ऍप मध्ये Dark mode चा ऑप्शन मिळेल. Google चा आगामी एंड्राइड वर्जन जो Android Q असू शकतो, हा dark mode सिस्टम अपडेट म्हणून अनु शकतो. असे बोलले जात आहे कि हा dark mode पुढील एंड्राइड वर्जन म्हणजे Android Q चा हाई लाइटेड फीचर असू शकतो आणि तसेच आता हा फीचर WhatsApp वर पण दिसू शकतो. इंटरनेट वर काही लीक झालेल्या कन्सेप्ट इमेज नुसार WhatsApp dark mode वर काम करत आहे.

विशेष म्हणजे हे फोटो WABetaInfo वर दिसले आहेत ज्यावर Android, iOS आणि Windows साठी अपकमिंग वॉट्सऍप अपडेट्स येत असतात. या लीक रिपोर्ट्सनुसार लवकरच यूजर्स साठी अपडेट येणार आहे ज्यात Dark mode फीचर मिळेल. एक खास बाब अजून सांगू इच्छितो ती म्हणजे बोलले जात आहे कि वॉट्सऍप मध्ये हा डार्क मोड फीचर आल्यामुळे यूजर्सच्या फोन बॅटरीची पण खूप बचत होईल.

नावावरूनच समजत आहे कि dark mode च्या या फीचरचा वापर डार्क म्हणजे काळोखाशी जोडलेला आहे. हा फीचर तुमच्या फोनच्या स्क्रीन बॅकग्राऊंडला ब्लॅक करतो. म्हणजे या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्र किंवा परिवाराशी एखाद्या अंधाऱ्या रूम किंवा एखाद्या ठिकाणी जिथे अंधार असेल, तिथे वॉट्सऍप वर बोलत असताना हा फीचर तुमची मदत करेल. आता यामुळे तुमची फोन स्क्रीन तुमच्या डोळ्यांना कमी त्रास देईल. नव्या रिपोर्ट्स नुसार dark mode च्या कांसेप्ट इमेज बद्दल बोलायचे तर फोटो मध्ये तुम्हाला बॅकग्राउंड स्क्रीन डार्क दिसत आहे पण लिहिलेला मेसेज किंवा टेक्स्ट जसे कि तुमच्या कॉन्टॅक्टचे नाव किंवा एखादा मेसेज, सफेद रंगात दिसत आहे.

त्यामुळे यूजर्स साठी हे खूप सोप्पे आणि सहज होईल, ते आंध्रात पण आपल्या डोळयांवर जोर न टाकता, वॉट्सऍप चॅट सहज करू शकतील. सोबतच WhatsApp dark mode तुमच्या फोनची बॅटरी लाइफ पण बऱ्याचप्रमाणावर वाचवू शकतो आणि खासकरून त्या फोन्सची जे OLED डिस्प्ले सह येतात. बोलले जात आहे कि iOS आणि Android दोन्हीसाठी हा फीचर येऊ शकतो. जाई सर्व WhatsApp फीचर्स येतात, Dark Mode पण आधी iOS यूजर्स साठी आणला जाऊ शकतो त्यानंतर Android वर हा सादर केला जाऊ शकतो.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :