WhatsApp मेसेंजर 2019 मध्ये यूजर्स साठी काही असे फीचर्स घेऊन येणार आहे जे त्यांचा मेसेजिंग एक्सपीरियंस अजूनच चांगला करू शकतात. तुम्हाला तर माहीतच आहे कि व्हाट्सॅप अशाप्रकारे आपल्या यूजर्सना लक्षात ठेऊन त्यांच्यासाठी फीचर्स अनंत असतो. याचकारणामुळे हा यूजर्सना खूप आवडणारा मेसेजिंग ऍप बनला आहे. 2018 मध्ये पण ऍप ने अनेक फीचर्स यूजर्सने दिले. असेच आता 2019 मध्ये पण त्यांना काही खास फीचर्स देऊन कंपनी आपल्या यूजर्सना खुश करणार आहे. आम्ही तुम्हाला ते फीचर्स कोणते आहेत त्याविषयी सांगणार आहोत.
एकेकाळी असे व्हायचे कि यूजर्सना अनेक वॉइस मेसेज ऐकण्यासाठी ते एक एके करून प्ले करावे लागत पण आता असे नाही होणार. यूजर्स हा नवीन फीचर आल्यामुळे फक्त पहिला वॉइस मेसेज प्ले करतील आणि त्यांनतर बाकी सर्व वॉइस मेसेज एकापाठोपाठ आपोआप प्ले होत राहतील.
या फीचरच्या माध्यमातून यूजर्स मीडिया फाईल्सचा प्रीव्यू घेऊ शकतील. आता पर्यंत यूजर्सना कोणताही फोटो, विडिओ किंवा GIF बघण्यासाठी ती उघडावी लागत होती पण आता कदाचित येत्या काळात असे होणार नाही. यूजर्स आधीच मीडिया कंटेंट नोटिफिकेशन ट्रे मधून या फीचरने चेक करू शकतील.
WhatsApp वर यूजर्स कॉन्टॅक्ट इंफर्मेशन सह शेयर करू शकतील. QR code च्या माध्यमातून कॉन्टॅक्ट इन्फो शेयर करता येईल. क्यूआर कोड शेयर केल्याने वॉट्सऍप आपोआप कॉन्टॅक्ट डीटेल वाचून ती यूजर्सच्या अड्रेस बुक मध्ये सेव करेल.
हे फीचर यूजर्सना सांगेल कि ते कोणत्या कॉन्टॅक्ट सोबत जास्त चॅट करतात. असे झाल्यास WhatsApp मध्ये यूजर्स साठी त्यांच्या कॉन्टॅक्टची रेटिंग तयार होईल. ज्या कॉन्टॅक्टस सोबत यूजर सर्वात जास्त मीडिया फाईल्स पाठवतात आणि मिळवतात त्यांना Good ranking श्रेणीती ठेवले जाईल.
या फीचरच्या माध्यमातून यूजर्स WhatsApp मधेच कॉन्टॅक्टस ऍड करू शकतील. या फीचर मध्ये यूजर्सना फक्त तो देश निवडावा लागेल जिथला तो नंबर आहे. त्यांनतर आपोआप त्या देशाचा कंट्री कोड टाकला जाईल नंतर यूजर्सना फक्त फोन नंबर टाकायचा आहे.
खूप काळापासून WhatsApp आपल्या डार्क मोड फीचर वर काम करत आहे. या फीचर ने व्हाट्सॅप चे बॅकग्राउंड डार्क होईल ज्यामुळे यूजर्सच्या डोळ्यांना आराम मिळू शकतो. तसेच OLED स्क्रीन्स सह येणाऱ्या डिवाइस मध्ये हे फीचर त्यांची बॅटरी लाईफ चांगली ठेवेल. हे फीचर याच महिन्यात लॉन्च होऊ शकते.
ग्रुप कॉलिंग साठी WhatsApp लवकरच शार्टकट आणणार आहे. हा Group call shortcut फीचर आल्याने यूजरना ग्रुप कॉल करण्यासाठी ग्रुप चॅट विंडो मध्ये एक शार्टकट मिळेल. ग्रुप मेंबर्स सिलेक्ट करून यूजर वॉयस किंवा वीडियो कॉल करू शकतील.