WhatsApp साठी Fingerprint Authentication होऊ शकते आवश्यक

Updated on 14-Jan-2019
HIGHLIGHTS

इंस्टंट मेसेजिंग ऍप वॉट्सॅप सध्या fingerprint authentication फिचर वर काम करत आहे. येत्या काळात युजर्सना अपना वॉट्सॅप उघडण्यासाठी फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन द्यावे लागू शकते.

महत्वाचे मुद्दे:

  • एंड्राइड युजर्ससाठी येईल हे फिचर
  • अंडर डेवलपमेंट आहे हे फीचर
  • ऍपला सुरक्षित ठेवेल हे नवीन फीचर

नुकत्याच आलेल्या काही रिपोर्ट्स नुसार बोलले जात आहे कि WhatsApp सध्या fingerprint authentication फिचर वर काम करत आहे. हे फीचर आणण्यामागचे कारण म्हणजे युजर्सचे चॅट सुरक्षित ठेवता येतील. त्याचबरोबर असे पण सांगितले जात आहे कि या फीचरचा वापर फक्त वॉट्सॅप चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी आणले जात नाही तर याने संपूर्ण ऍप पण सुरक्षित राहील. सिक्योरिटी फीचर अंतर्गत हे फिचर कंपनी जारी करण्याची तयारी करत आहेअसे आपण म्हणू शकतो.

रिपोर्ट्स नुसार वॉट्सॅप iPhone युजर्ससाठी असेच एक फीचर आणणार होती. तुम्हाला तर माहितीच आहे कि iPhone मध्ये या फीचर अंतर्गत युजर्सना दोन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन मेथड्स मिळतील ज्यात Face ID आणि Touch ID असतील. पण या आगामी फीचर बद्दल बोलायचे तर हा सध्या फक्त एंड्राइड युजर्ससाठी उपलब्ध कारण्याबद्दल कंपनी विचार करत आहे तर नंतर हे iPhone युजर्ससाठी आणले जाऊस शकते. तसेच Android युजर्ससाठी fingerprint authentication फीचर मध्ये facial recognition आधारित ऑथेंटिकेशन नसेल.

WABetaInfo नुसार एक फॅन साइट जी वॉट्सॅप फीचर सर्वात आधी टेस्ट करते सांगत आहे कि या फीचर वर कंपनी सध्या काम करत आहे. तसेच हे फीचर बाय डीफॉल्ट Android 2.19.3 बीटा वर्जन मध्ये डिसेबल्ड आहे. रिपोर्ट नुसार Face ID आणि Touch ID फीचर्स iOS वर आणण्यासाठी काम केल्यानंतर WhatsApp ने एंड्राइड वर वॉट्सॅप साठी ऑथेंटिकेशन फीचर वर युजर्सच्या फिंगरप्रिंट्स बद्दल काम कार्याला सुरवात केली आहे.

हे फीचर एकदा आले कि WhatsApp पूर्णपणे सुरक्षित होईल आणि कोणीही कोणत्याही युजरचे चॅट आणि मीडिया कंटेंट बघू शकणार नाही. तसेच जर तुमच्या फोन मध्ये हे फीचर आधीच असेल तर तुम्हाला पण खास कन्वर्सेशन उघडण्यासाठी ओळख दयावी लागणार नाही. Android Marshmallow आणि त्यावरील नवीन ऑपरेटिंग सिस्टम्स सोबत हे फीचर येऊ शकते.

WhatsApp वर fingerprint authentication फीचर इनेबल करण्यासाठी युजर्सना Settings > Account > Privacy मध्ये जावे लागेल जे लवकरच तुमच्या फोन मध्ये येऊ शकते.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :